नैराश्याच्या गर्तेत नासिक जिल्हा परिषद ! वरिष्ठांचा जाच या संशोधनाच्या विषयाला कुणीतरी हात घालायला हवा !! खालील लिंकवर क्लिक करा मंथन करून तणावमुक्त रहा-संपादक

जिल्हा परिषद नासिक अंतर्गत काम करीत असतांना कर्मचाऱ्यांना नैराश्याच्या गर्तेत अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व त्यातून घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेणे आज प्रशासनापुढील मोठे आव्हाण असल्याचे दिसत आहे,
वरिष्ठांचा जाच सहन करणारे अनेक कर्मचारी आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीमुळे पळ काढू शकत नाहीत तरीही कालची सिन्नर येथील आरोग्यसेविकेची आत्महत्या हे त्याचेच द्योतक असल्याचे बोलले जात आहे,
अडीच महीन्यापूर्वी आरोग्य विभागांतील मालेगांव तालुक्यातील कर्मचाऱ्याची आत्महत्याही चर्चेत आली होती, वरिष्ठांचा जाच होतो की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी परिस्थितीनुसार जाच होण्याचे पारडे जड ठरत आहे, याचा परिणाम काही अधिकारी कर्मचारी स्वेच्छानिव्रुत्ती घेऊन मुक्त होण्याचा मार्ग अवलंबतात,
आरोग्य व शिक्षण विभागाकडे सत्ताधाऱ्यांचे एक मोठे कुरण म्हणून बघण्याचे कारणही अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे.
वरिष्ठांच्या जाचासोबतच ठेकेदाराने केलेल्या दादागीरीचे गेल्या आठवड्यातील प्रकरणानेही जिल्हा परिषदेचे वातावरण ढवळून निघाले होते, मागच्या सर्वसाधारण सभेदिवशी अधिकारी-कर्मचारी भांडण जे थोबाडीत मारण्यापर्यंत मजल गाठते याला काय म्हणावे ?  कामचुकार व काम करणारे असे दोन गट जेथे अस्तित्वात असतात तेथे अशा घटना घडत असतात त्या घडू नये यांसाठी प्रशासनाकडून उपाय शोधणे गरजेचे वाटते, यांच शहरांत पोलीस आयुक्तांकडून कर्मचाऱ्यांकरीता तणावमुक्तीचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत, त्यांची व्याप्ती वाढवून काही उपक्रमांच्या माध्यमातून शहरवासियांनाही सामील केले जाते यामुळे शांतता व सलोखा राखण्यात यश मिळण्यास उपयुक्त ठरते, ही तुलना नाही-उदाहरण आहे,
*स्वेच्छानिव्रुत्ती नक्की स्वेच्छेने घेतली जाते ?*
ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतून स्वेच्छानिव्रुत्तीचा पहिला प्रस्ताव प्रशासनाकडे सादर झाला असुन स्वेच्छानिव्रुत्तीचे कारण कागदोपत्री वैध असेलही पण थोड्या विश्वासाने चर्चा केल्यास तेथेही वरिष्ठांचा जाच असु शकतो अशी शंका घेण्यास वाव आहे, याच विभागांतून स्वेच्छानिव्रुत्तीचे दोन ते तीन अर्ज लवकरच प्रशासनाकडे सादर होण्याची चर्चा कशाचे चिन्ह मानावे ?
नासिक मनपातील स्वेच्छानिव्रुत्तीच्या वाऱ्याने शहर ढवळून निघाले असतांनाच त्याची लागण जिल्हा परिषदेला लवकरच लागणार असे चित्र निर्माण झाले आहे यांवर आता मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ नरेश गितेंनी लक्ष घालून कामसू कर्मचाऱ्यांचा सन्मान व इतरांसहीत सर्वांना तणावमुक्तीबाबत तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्यात पुढाकार घ्यायला हवा असे वाटते जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।