भुजबळ म्हटलं की राजकीय, सामाजिक, व प्रशासनात 'जान' कशी आणी कुठून येते ? संजय राऊत दोन जानेवारीला कसा 'च' लावणार !! होऊ घातलेल्या दिमाखदार वास्तुच्या भूमीपूजनाचा एक राजकीय 'डाव' खालील लिंकवर क्लिक करून वाचा !!!

"जिल्हा परिषद नवीन वास्तू भुमीपूजन स्थळावरून न्यूज मसाला !"

"लोहा गरम है, मारो हातोडा"
     नासिक::- येत्या ३० तारखेला खोळंबलेला मंत्रीमंडळ विस्तार होत आहे तत्पूर्वी प्रस्तावित जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पार पाडण्यात आले. ग्रामविकास खात्याचा पदभार ना. छगन भुजबळांकडे आहे व तो कायम राहील की नाही हे लवकरच कळेल. त्या आधी भुजबळांनी अशी आलेली संधी सोडली ! असं शक्य नाही हे सर्वश्रुत आहे, अवघ्या दोन दिवसांत सारी राजकीय, प्रशासकीय यंत्रणा कामाला जुंपून भुमीपूजनाचा बार उडवून आपल्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. भुजबळ म्हटलं की राजकीय, सामाजिक, प्रशासनात नवी "जान" कशी आणी कुठून येते हे स्व:ता भुजबळंनाही शोधून सापडणार नाही पण परिस्थिती तशी आपसूकच निर्माण होते.
"अशा वेळी जर "लोहा गरम है तो हातोडा मारणें मे " कोण उशीर करेल"
      या गडबडीत प्रशासनाने मोठमोठे फलक लावले, फलकावर काय लिहिले हे तपासायला ही वेळ मिळू नये ईतक्या घाईघाईने कार्यक्रम उरकला हा त्याचाच पुरावा समजावा काय हे त्याचे उदाहरण !
     फलकावरील अक्षरेच सांगताहेत
"जिल्हा पश्षिद नासिक"
         भुजबळांकडे ग्रामविकास खाते राहो न राहो मात्र जिल्हा परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ नवीन वर्षारंभी सुरू होणार हे निश्र्चित असल्याने जुन्या पदाधिकाऱ्यांचे कोनशिलेवर नांव कोरुन घेण्याची घाई दिसून येते, कारण प्रस्तावित इमारतीचा आराखडा खरोखर देखना व प्रशंसनीय आहे अन् त्याचे श्रेय घेतले नाही तर राजकारणी म्हणवून घेण्याची क्षमता नसल्याचे सिद्ध होते !
        जिल्हा परिषदेत खिचडी सत्ता असल्याने कोणत्याही एका पक्षाला श्रेय घेता येऊ शकत नव्हते व भविष्यात ही कुणाला या श्रेयाचे भांडवल करता येणार नाही हे जसे निश्र्चित समजावे तेथे भूमीपूजनाचा मांडलेला डाव "हार ना जीत" असा म्हणावे लागेल. याचाच अर्थ "लोहा गरम है, हातोडा मार दो, लेकीन जो भी कुछ बनाना है वो तो सही बने !"
        सांगायचा मुद्दा असा की कार्यक्रमाला संजय राऊत दोन प्रकारच्या भुमिकेत हजर होते, शिवसेना नेते व पत्रकार, आणि "च" लावण्याची त्यांनी अत्रेंच्या मराठा दैनिकानंतर वापरलेली पद्धत "होणार-च" आणि घडवूनही आणले, हे तेच शिवसेना नेते या भूमिकेतले संजय राऊत नासिक जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेचा अध्यक्ष करण्यासाठी "च" लावणार का ? नाहीतर राज्यात ज्यांचे संख्याबळ ५६ असताना १०५ ला विरोधी पक्षात बसायला लावले तसा "च" नियम थोड्याफार फरकाने नासिक जिल्हा परिषदेतही लागला तर "हिंदूस्थान-भारत" असा मैत्रीपूर्ण "सामना" पुढील दोन वर्षे पहायला मिळू शकेल !
          पत्रकार या भूमिकेतले संजय राऊत "आयुष्यातील पहील्याच प्रशासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहीलो" या त्यांच्या वाक्याचा रोख नक्की काय होता ?  प्रशासनावर भुजबळांची जितकी पकड आहे तितकीच पकड प्रशासनाचे कौतुक करत मिळवू शकतो असा  "च" असावा, तसा अपरोक्षपणे इशाराच दिला आहे असे त्यांच्या देहबोलीतून व केलेल्या भाषणातून दिसून येते. फुकट योजना कशा राबवाव्यात असा सल्ला देताना महाराष्ट्र सदनाला विसरले नाहीत, विसरलेत फक्त "शेतकरी",  चहाच्या निमित्ताने आठवण करून दिलेल्या शेतकऱ्यांना, जो मिनी मंत्रालयाचा खरा मालक आहे त्यालाच, अर्थात हा विषय राजकीय असल्याने पत्रकार या भूमिकेतून त्यांनी टाळला असावा असं समजून घेतलं पाहिजे !




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !