रेमिनी इसेंस अर्थात गत आठवणींना उजाळा - २०२० या पुर्न:भेट सोहळ्याचे आयोजन ! मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा रंगतदार कार्यक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

रेमिनी इसेंस (गत आठवणींना उजाळा २०२०) - मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल काॅलेजमध्ये पुनःभेटीच्या सोहळयाचे रंगतदार आयोजन !

           नासिक::- दि. २५ व २६ जानेवारी २०२० रोजी मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागील २५ वर्षापासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुन:भेटीच्या रंगतदार सोहळयाचे आयोजन महाविद्यालयाच्या आवारात आयोजित केला आहे. यापुर्वी २०१५ मध्ये अशाच प्रकारचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांचा उदंड उत्साह पाहून दर पाच वर्षांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी इच्छा प्राचार्य डाॅ. एफ. एफ. मोतीवाला यांनी व्यक्त केली होती. या महाविद्यालयातून ज्ञानार्जन करुन आपआपल्या निजी जीवनात स्थिर स्थावर झाालेल्या मित्रांची भेट घडवून आणणे,  त्यांच्याशी हितगुज साधणे व महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांशी संवाद साधून महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सोहळयाच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
           मोतीवाला काॅलेजची स्थापना सन १९८९ मध्ये झााली. स्थापना वर्षापासून चे विद्यार्थी या सोहळयात सहभागी होणार आहेत. प्राचार्य डाॅ. एफ. एफ. मोतीवाला व मोतीवाला एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट च्या विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला हे उपस्थितांचे स्वागत करून त्यांना संबोधित करणार आहेत.
           दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ठवदपितम या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२६ जानेवारी रोजी सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार असून तदनंतर देशभक्तीपर गीतांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, मागील आठवणींना उजाळा देणारा ’यादे वुईथ यादव सर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या मागील ३० वर्षांच्या अनंत आठवणींचा उलगडा करणारी चि़त्रफीत विविध छायाचित्रांसह प्रदर्शित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासह आनंदमेळयाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्या मध्ये नाशिकमधील खाद्यजगताचे नामवंत सहभागी होत आहेत. या कार्यक्रमास २००० च्या आसपास देश विदेशात स्थायिक झाालेले माजी विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचेे आवाहन प्राचार्य, डाॅ. एफ. एफ. मोतीवाला यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!