रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

रेमिनी इसेंस 2020 पुनःर्भेट सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!!

     नासिक::-मोतीवाला होमिओपॅथिक मेडीकल काॅलेज मध्ये दि. २५/२६ जानेवारी रोजी माजी विद्यार्थ्याचा पुनःभेटीचा रंगतदार सोहळा महाविद्यालयाच्या आवारात संपन्न झाला.
          देश विदेशातील माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचा स्वागत समारंभ २५ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थनेने झाली. मागील २५ बॅचेसचे माजी वर्गप्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी यांचे स्वागत व्यासपीठावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण व मार्गदर्शन प्राचार्य डाॅ.  एफ.एफ.मोतीवाला व मोतीवाला एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर ट्रस्ट च्या विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी केले, या प्रसंगी प्राचार्य डाॅ. एफ.एफ.मोतीवाला यांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांचे गौरवोदपर भाषण केलेे व त्या सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. त्याचप्रमाणे विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला यांनी सर्व विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण असल्याचे नमूद केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी समाजामध्ये चांगली रूग्ण सेवा देऊन महाविद्यालयाचे नांव लौकिक टिकवून ठेवावा असा संदेश  दिला. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रातिनिधीक स्वरुपात काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील शिक्षण आणि त्याचबरोबर दिलेले संस्कार यांनी आमचे आयुष्य घडले व एक परिपक्व डाॅक्टर म्हणून नावाजलो अशी कृतज्ञता व्यक्त केली.
     सायंकाळी ५:३० वा. सांस्कृतिक कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपले गायन व नृत्य कलाविष्कार सादर केले. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कविता, एकपात्री प्रयोग, वाद्यवादन, गाणे असे विविध कार्यक्रम सादर केले. दि. २६ जानेवारीला आजी आणि माजी विद्यार्थ्यानबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण केले, या कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाच्या गत आठवणींना उजाळा देणारा ’’यादे विथ यादव सर’’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिकत असताना तत्कालिन परिस्थितीत घडलेले मजेदार प्रसंग कथन केले.
        या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांनी आनंद मेळयातील खाद्य पदार्थांच्या स्टाॅलवर चवदार पदार्थाचा आस्वाद घेत केली. या आनंदमेळयात नाशकातील नामवंत खाद्यविक्रेत्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाला १५०० चर्या आसपास माजी विद्यार्थी उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी काॅलेज प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
      कार्यक्रमाला प्राचार्य डाॅ. एफ.एफ.मोतीवाला, विश्वस्त डाॅ. सौ. ए. एफ. मोतीवाला, डाॅ. फराज मोतीवाला, डाॅ. सहार मोतीवाला सिंग, अॅडव्होकेट पर्ल मोतीवाला आझादी यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!