८ जानेवारीच्या देशव्यापी संपाचे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ...! संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे आवाहन तर संपात उतरणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनकडून पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले !! दोन्ही बातम्या सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

८ जानेवारीच्या देशव्यापी संपात जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, कंत्राटी व  किमान वेतन कर्मचारी होणार सहभागी याबाबत चे निवेदन जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. ...
        नासिक::- देशभरातील महागाई , आर्थिक मंदी, बेरोजगारी, कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल ,  खाजगीकरण कंत्राटी करण, आणि जन विरोधी धोरणामुळे केंद्र सरकार विरोधी देशभरातील केंद्रीय ट्रेड युनियन व अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा विविध, अखिल भारतीय कामगार कर्मचारी, असंघटित कामगार, कंत्राटी कामगार, किमान वेतन कर्मचारी, श्रमिक - शेतकरी या संघटनांचेे देशात २ कोटी औद्योगीक कामगार - कर्मचारी, श्रमीक वर्ग  ८ जानेवारी २०२० ला आपल्या मागण्यांकरीता एक दिवसाच्या देशव्यापी संपात सहभागी होत आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व इतर जिवनावश्यक वस्तूवरील दर नियंत्रनात आणा, अतिवृष्टीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून तात्काळ मदत द्या. स्वामीनाथन आयोग लागु करा, औषधे, खते, बियाणे यांच्या किंमती नियंत्रनात आणा, केंद्र व राज्य सरकारचे विविध विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरा, रद्द व व्यपगत करण्यात आलेली पदे पुनर्जिवित करा, डीसीपीएस मधील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना रुपये दहा लक्ष सानुग्रह अनुदान लागु करा, बक्षी समितीचा दुसरा खंड प्रसिद्ध करून कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी दुर करा, केंद्राप्रमाणे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते लागू करा , जानेवारी१९ चा महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै१९ पासून थकीत महागाई भत्ता लागू करा, अनुकंपा तत्त्वावरील सर्व प्रस्ताव विना अट निकाली काढून रिक्त पदे तात्काळ भरा, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे बाल संगोपन रजा मंजूर करा, जिल्हा परिषद क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना मुख्यालया बाबतचा ग्रामविकास विभागाचा ९ सप्टेंबर१९ चा शासन आदेश रद्द करा, उत्कृष्ठ कामासाठी पूर्वीप्रमाणे आगाऊ वेतन वाढी लागू करा, केंद्र शासनाने विहीत केल्यानुसार ५ दिवसाचा आठवडा, केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्ष करणे, कंत्राटी, ग्रामरोजगार सेवक, व संगणक परीचालक कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावणे, सहाय्यक गट विकास अधिकारी यांचे नविन पदे निर्मीती करून जिल्हा परीषद संवर्गातुन रिक्त पदे तात्काळ भरणे, मागील काळात सरकारचे  "सकारात्मक चर्चा व नकारात्मक धोरणामुळे " शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासह सर्व  कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत प्रश्न मार्गी लावणे, ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना यावलकर समितीच्या शिफारशी नुसार नगर परीषद कर्मचाऱ्यां प्रमाणे वेतन भत्ते व सुधारीत आकृती बंध लागू करणे, अंगणवाडी कार्यकर्ती-मदतनीस व आशा सेविका यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवुन वेतनश्रेणी लागु करणे, कामगार कायद्यातील कामगार विरोधी व मालक धार्जीने बदल मागे घेणे, देशातील सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण निर्णय बंद करणे, औद्योगिक उद्योगांचे परराज्यात होणारे स्थलांतर थांबविणे , बंद पडलेले कारखानदारी सुरू करून नवीन उद्योगधंद्यांना चालना देणे, नाशिक सह इतर प्रमुख शहरांत आयटी पार्क हबला चालना देऊन शिक्षणावर लाखो रुपये खर्च झालेल्या युवकांची बेरोजगारी कमी करणे, या प्रमुख मागण्या करीता जिल्हा परीषदेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, उद्योग , कृषी तांत्रीक, पशु चिकीत्सा, शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता, अंगणवाडी सुपरवायझर, शिक्षक शिक्षकेत्तर, नर्सेस, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ अधिकारी, लिपीक, लेखा विभाग, वाहन चालक, परीचर, मैल कामगार या जिल्हा परीषद संवर्गातील कर्मचारी संघटना सह सर्व विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी, अंगणवाडी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, संगणक परिचालक, संघटना पदाधिकारी यांनी देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय सहविचार सभेत घेण्यात आल्याने याबाबतचे निवेदन नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. एस. भुवनेश्वरी यांना देण्यात आले.
८ जानेवारी ला सकाळी ११ वाजता गोल्फ क्लब मैदानावर उपस्थीत राहुन देशव्यापी संप यशस्वी करा असे आवाहन प्राथमीक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, राज्य जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचे विभागीय उपाध्यक्ष  कैलास वाघचौरे, महासंघाचे राज्य उपाध्यक्षा शोभाताई खैरणार, जिल्हाअध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस महेंद्र पवार , कार्याध्यक्ष डॉ.भगवान पाटील, सौ. मंगला भवार यांनी दिली. यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी केदु देशमाने, संजय पगार, मुक्ता पवार, मोतीराम नाठे, आर के खैरनार, राहुल सोनवणे, प्रमोद लोखंडे, अर्जुन भोये निवृत्ती तळपाडे, रमेश गोहील, सचिन वडजे, सुभाष आहिरे , धनंजय आहेर, उत्तम केदारे, बबन चव्हाण, मुख्याध्यापक संघटनेचे प्रकाश गोसावी, शिक्षण विस्तार  अधिकारी संघटनेचे मनोहर सुर्यवंशी,
पशु चिकीत्साचे संतोष पजई सुभाष वाघमोडे
ग्रामसेवक युनियनचे रविंद्र शेलार,अंगणवाडी सुपरवायझरचे विनया महाले, शाखा अभियंताचे इंजि. रावसाहेब पाटील, राजेंद्र चव्हाण, स्थापत्य अभियांत्रीकीचे सुभाष आहिरे, नामदेव भोये, नितीन भडकवाडे गायत्री पवार, लिपिक वर्गीयचे प्रमोद निरगुडे, सचिन विंचुरकर, निवृत्ती बगड,
काष्ट्राईब महासंघाचे उदय लोखंडे, लेखा विभागाचे चंद्रशेखर फसाळे,दिनकर सांगळे, ग्रामपचायत विस्तार अधिकारीचे ए के गोपाळ, संजय पवार, श्रीधर सानप, कृषी तांत्रीकचे नंदकिशोर आहेर, विजय चौधरी, नर्सेसचे मंगला धुर्जड, बेबी काठे, औषध निर्माण अधिकारीचे जी.पी. खैरनार, विजय देवरे, फैय्याज खान, सचिन अत्रे प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ अधिकारीचे मधुकर आढाव, संजय पगार, कैलास देवरे, आरोग्य संघटनेचे विजय सोपे, बाळासाहेब कोठुळे, वाहन चालक संघटनेचे योगेश गोळेसर, शिवाजी हिंगमिरे, परिचरचे विलास शिंदे, मदन वाडेकर, मैल कामगारचे यासीन सय्यद, तुळशिराम पाटील , ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सखाराम दुरगुडे, अंगणवाडी कर्मचारीचेे राजेश सिंग, बिजपाल सिंग, आशा सेविकाचे माया घोलप, कंत्राटी बीआरसी चे वैभव पाटील, महेश भामरे, ग्रामरोजगार व मग्रारोहयोचे सचिन पाटील अनिल बिचकुले  व जिल्हा महासंघाचे पदाधिकारी अर्जुन गोटे , बेबी मोरे, किशोर वारे ,ज्योती गांगुर्डे, सोनाली साठे, रवींद्र ठाकरे, रंजना शिंदे, महेंद्र गांगुर्डे , धनश्री पवार, सुनील पगार, वर्षा जाधव, प्रमिला चौरे, रघुनाथ सूर्यवंशी, चेतन जाधव उपस्थित होते.
__________________________________________
__________________________________________
जिल्हा परिषद कर्मचारी दिनांक ८ जानेवारी २०२० चे संपात सहभागी नाही !
     नासिक::-दि.८ जानेवारी, २०२० रोजी देशपातळीवर अनेक संघटना मिळुन केंद्रीय पातळीवर प्रलंबित असलेल्या मागण्या व कामगार हिताविरूध्द़ केंद्र सरकार जी सध्या पावले उचलत आहे. त्याबद्दल केंद्रीय कर्मचारी संघटनांनी एक दिवसाचे संपाचे आवाहन केलेले आहे. त्यानुषंगाने राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्व़य समिती महाराष्ट्र यांनी देखील या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. या एक दिवसाच्या लाक्षणिक संपामध्ये ज्या मागण्या प्रामुख्याने घेतल्या आहेत त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्याचा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा थेट संबंध येत नाही. महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जे शासन सत्तेवर आलेले आहे, त्यांस जवळपास १ महिना होत आलेला आहे. या नवीन सरकारशी थेट संवाद झालेला नाही.  जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून या मागण्यांचा आणि दि.0८ जानेवारी, २०२० रोजी देश पातळीवरील संपाशी काहीही एक संबंध नाही. आपल्या मागण्या या राज्य़ सरकारशी निगडीत असुन नवीन सरकारला याबाबत अद्याप पुरेशी संधी मिळालेली नाही.
      आपल्या मागण्यांबाबत त्यांना अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी संधीही दिलेली नाही. ग्रामविकास मंत्री, वित्त़ मंत्री कोण हे देखील आपणांस अद्याप माहीत नाही. मुख्य़मंत्री यांना देखील याची कल्पना नाही. अशा परिस्थितीत नवीन सरकारच्या विरोधात ८ जानेवारी २०२० चे संपात  सहभागी होणे हितकारक होणार नाही.




  याबाबत महाराष्ट्र राज्य़ जिल्हा परिषद कर्मचारी युनियन रजि.नं.४३४० (सर्व संवर्गिय संघटना) व त्याचबरोबर लेखा कर्मचारी व आरोग्य़ कर्मचारी संघटनेची केंद्रीय कार्यकारिणी बैठक दि. २९ डिसेंबर १९ रोजी नांदेड येथे पार पडली. सदर बैठकीस राज्यातील २६ जिल्हयांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनेचे राज्याध्य़क्ष बलराज मगर, कार्याध्य़क्ष  बाबूराव पूजरवाड, सरचिटणीस विवेक लिंगराज, लेखा कर्मचारी संघटनेचे अध्य़क्ष विजयसिंग सुर्यवंशी, सरचिटणीस सुदाम पांगूळ, आरोग्य़ कर्मचारी संघटनेचे अध्य़क्ष अरूण खरमाटे, कार्याध्य़क्ष प्रमिला कुंभार आदि उपस्थित होते. सदर बैठकीला नाशिक मधुन संघटनेचे अध्य़क्ष विजयकुमार हळदे, प्रकाश थेटे, प्रशांत कवडे, श्याम पाटील, श्रीरंग दिक्षीत, अमित पाटील, संदिप दराडे, अविनाश राठोड इ.उपस्थित होते.
बैठकीमध्ये सर्व जिल्हांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन नवीन सरकारला आपल्या मागण्यांबाबत संधी देण्यासाठी त्यांचे बरोबर चर्चा करून तदनंतरच मागण्या मंजुर करणेबाबत त्यांना काही वेळ देऊ असे एकमताने ठरले. त्यामुळे दि.८ जानेवारी, २०२० च्या देश पातळीवरील एक दिवसीय संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सदर संपात नाशिक जिल्हा परिषदेतील जिल्हयातील जिल्हा परिषद सर्व संवर्गिय कर्मचाऱ्यांनी सहभागी होवू नये असे आवाहन अध्य़क्ष विजयकुमार हळदे, लेखा कर्मचारी संघटनेचे अध्य़क्ष  चंद्रशेखर फसाळे, आरोग्य़ कर्मचारी संघटनेचे अध्य़क्ष राजेंद्र बैरागी, अनिल गिते, शितल शिंदे, राजेश ठाकुर, दिनकर सांगळे, अबू नाना शेख, अजय कस्तुरे, प्रकाश थेटे, प्रशांत कवडे, श्रीरंग दिक्षीत, श्याम पाटील, अमित आडके, संदिप दराडे, मिलिंद पाने, अजित आव्हाड, कानिफ फडोळ, योगेश बोराडे, दिलिप टोपे, मच्छिंद्र साबळे, मधुकर पूंड, शालिग्राम उदावंत, सचिन पाटील, रवींद्र देसाई, छाया पाटील, संगिता माळोदे, मंदाकिनी पवार, उत्त़म चौरे, संजय पूरकर, चंद्रकांत वैष्ण़व, संतोश गडदे, विनायक जाधव, वसंत जायभावे, सुभाष पवार, ओमप्रकाश पाटोळे, रवींद्र गायकवाड, प्रमोद जाधव, सुनिल सोनवणे, दिनेश पगार, सुनिल पवार, किरण आगासे, भुषण गायकवाड, मोरेश्व़र निफाडे, शिवाजी उगले, रोहिदास जाधव, अशोक चव्हाणके, उज्व़ला राव, सिमा वानखेडे, प्रशांत कदत, हेमंत कोठावदे, राजेंद्र भोर, संजय पाटे, भगवान पवार, सुवर्णा सिन्ऩरकर, प्राजक्ता खरोटे, अर्चना शिंदे, आश्विनी झेाले, अर्चना गांगुर्डे, इत्यादींनी केले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!