रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


रस्ता उखडून फेकल्याने संपर्कच तुटल्यामुळे फणसपाडा ग्रामस्थ संतप्त !

सुरेश भोर यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,

   नाशिक::-तालुक्यातील गंगाम्हाळुगी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या फणसपाडा गावास  १००वर्षापुर्वीपासून दळणवळणाच्या दुष्टीने जोडणारा मुख्य व महत्त्वाचा रस्ता येथील काही नागरिकांनी उखडून फेकल्यानेआता संपर्कच तुटल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.
      याबाबत ची माहिती अशी की तालुकच्या पश्चिम पट्टयातील आदिवासी व दुर्गम भागातील फणसपाडा ग्रामस्थ गेल्या वर्षभरापासून तालुका प्रशासनाकडे मजबूत व हक्काच्या रस्त्यासाठी मागणी करून पाठपुरावा करत आहेत.व याबाबत तहसिलदार अनिल दौंडे यांनी कार्यवाही ही सुरू केली आहे. मात्र आता यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूकीत व्यस्त असल्याचा फायदा घेऊन काही मोजक्याच नागरिकांनी रस्ता उखडून फेकून पुर्ण गावास वेठीस धरले आहे. अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. व तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे .अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व
व्यक्त केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.