हॅशटॅग चिपको चळवळीला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद ! यमराजाच्या वेशभूषेतून जनजागृती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


न्यूज मसाला सर्विसेस
नासिक 7387333801

हॅशटॅग चिपको चळवळीला

राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद !


नाशिक( प्रतिनिधी) - शनिवारी (दि१२) नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी नागरिकांनी एकत्र येत अवैध वृक्षतोडी विरोधात हॅशटॅग चिपको चळवळ उभी केली. त्याला काहीजणांनी फोन करुन विरोध दर्शविला. मात्र त्याचवेळी असंख्य निसर्ग व पर्यावरणाबाबत जागरूक असणाऱ्यांनी चळवळीला पाठिंबा देत मदतीचा हात पुढे केला. त्यामुळेच या चळवळीचे लोण राज्यभरात पसरु लागले असून सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा उपक्रम व्यापक बनला आहे.
         आज गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाचे जलतज्ज्ञ राजेश पंडित यांनी चळवळीत सहभागी होत सध्याचा प्रश्न केवळ २९ झाडांपुरता मर्यादित नसून हजारो झाडांशी व पर्यावरणाशी निगडित आहे असे स्पष्ट केले. यावेळी यमराजाच्या वेशातील कलाकाराने अनोखी जनजागृती केली. उत्तुंग झेप फाउंडेशनचे रोहन देशपांडे व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हॅशटॅग चिपको चळवळ उभी राहिली आहे. काल दुसऱ्या दिवशीही कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक उपक्रम राबविला. यावेळी राजेश पंडित म्हणाले, सर्वोच्च व मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात वेळोवेळी स्पष्ट निकाल दिले आहेत.असे असतांना महापालिका व वृक्ष प्राधिकरण झाडांची कत्तल करीत असेल तर तो न्यायव्यवस्थेचा अवमान ठरेल.वृक्षप्रेमींच्या चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. जी झाडे रहदारीच्या आड येत असतील ती न तोडता महापालिकेने त्याजवळ छोटी बेटे निर्माण करावी. दिशादर्शक व रिफ्लेक्टर्स लावावे.निरी व अन्य संस्थांनी पुनररोपित केलेली ८० टक्के झाडे वाचली आहेत. मात्र यापूर्वी विकासाच्या नावाखाली हजारो झाडांचा बळी गेला आहे. आता संघर्षाऐवजी संबंधित व्यक्ती व संघटनांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढावा व झाडे वाचवावी असे आवाहन त्यांनी केले. रोहन देशपांडे म्हणाले, पर्यावरण रक्षक व निसर्गप्रेमी जनतेच्या पाठिंब्यावर ही चळवळ सुरूच राहील. एव्हढेच नव्हे तर ती अधिक व्यापक बनली आहे. यावेळी असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!