अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत (पेसा) ५% थेट निधीचे वितरण ! तिसऱ्या टप्यात १३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त ! आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी निधी वापराची खबरदारी घ्यावी- जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर ! ग्रामपंचायत विभागाने आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी खर्च करावा-मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पेसा  ५% थेट निधीचे वितरण !

तिसऱ्या टप्यात १३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त !

        नाशिक - सन २०२०-२१ वर्षात आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत विकासकामांसाठी तिसऱ्या टप्यातील १३ कोटी ९६ लक्ष ५५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, राज्य शासनातर्फे पहिल्या टप्प्यातील निधी २९ जानेवारी २०२१, दुसऱ्या टप्प्यातील १७ मार्च २०२१, व २७ एप्रिल २०२१ रोजी तिसऱ्या टप्प्यातील सम प्रमाणातील निधी थेट ग्रामपंचायतींना वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. नाशिक जिल्हातल्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% निधी योजनेच्या तिस-या टप्प्याचा निधी १८ मे रोजी थेट ग्रामपंचायतींना प्राप्त झाला असुन यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील विकासकामांना गती मिळणार आहे. जिल्ह्याल्या नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण, देवळा या नऊ तालुक्यातील ५७४ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असुन १०४५ गावांना या निधीचा लाभ होणार आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायतींच्या खात्यात RTGS प्रणालीद्वारे थेट निधीचे वितरण केले गेले आहे. सदरचा निधी संबंधित ग्रामसभेने त्या अंतर्गत येणारे गाव, वस्ती, वाडी, पाडा यांच्या आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च करावा. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेला निधी बाबनिहाय खर्च करतांना अ) पायाभूत सुविधा ब) वन हक्क अधिनियम (FRA ) व पेसा कायद्याची अमंलबजावणी क) आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व ड) वनीकरण, वन्यजीव संवर्धन, जलसंधारण, वनतळी, वन्यजीव पर्यटन व वन उपजिविका या बाबीं करीता प्रत्येकी १/४ या प्रमाणत विनियोगात आणावा असे या शासन आदेशानुसार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली असून संपूर्ण निधीचा योग्य विनियोग कसा होईल याबाबत नियोजन करण्याचेआदेश पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींन निर्गमीत केले.
**********************************
"पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना प्राप्त होणार निधी हा आदिवासी जनतेच्या कल्याणाकरिता खर्च करण्यात येईल याबाबत ग्रामपंचायतींनी योग्य ती खबरदारी घेऊन नियोजन करावे." - बाळासाहेब क्षीरसागर, जि. प.नाशिक
**********************************
"पेसा ग्रामपंचायतींनी त्या अंतर्गत येणाऱ्या गाव, वस्ती, वाडी, पाडा यांच्या आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी खर्च करावा, या भागातील पायाभूत विकासकामांना गती द्यावी असे आदेश ग्रामपंचायत विभागास देण्यात आले आहेत." - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक
**********************************

तालुका-
नाशिक
ग्रामपंचायत संख्या - ३२
पेसा गावे - ४७
प्राप्त निधी - ७५३८८३१
इगतपुरी
ग्रामपंचायत संख्या - ६३
पेसा गावे - ६६
प्राप्त निधी - ९७४८५१५
त्र्यंबकेश्वर
ग्रामपंचायत संख्या - ८४
पेसा गावे - १२४
प्राप्त निधी - १९६७८५३२
पेठ
ग्रामपंचायत संख्या - ७३
पेसा गावे - २१३
प्राप्त निधी - १९३४६५८७
सुरगाणा
ग्रामपंचायत संख्या - ६१
पेसा गावे - १९०
प्राप्त निधी - २५००६४६८
दिंडोरी
ग्रामपंचायत संख्या - १०३
पेसा गावे - १३८
प्राप्त निधी - २३२३००८५
कळवण
ग्रामपंचायत संख्या - ८६
पेसा गावे - १५१
प्राप्त निधी - २०९७७०७१
बागलाण
ग्रामपंचायत संख्या - ५०
पेसा गावे - ७५
प्राप्त निधी - ११७४६६९९
देवळा
ग्रामपंचायत संख्या - २२
पेसा गावे - ४१
प्राप्त निधी - २३८२२४६

एकूण
ग्रामपंचायत संख्या - ५७४
पेसा गावे - १०४५
प्राप्त निधी - १३९६५५०३९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!