“भारत देश मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग या आजारांची राजधानी बनू पहात आहे.”- डॉ. उज्ज्वल कापडणीस
 
“भारत देश मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग या आजारांची राजधानी बनू पहात आहे.”- डॉ. उज्ज्वल कापडणीस          नासिक (सुचेता बच्छाव)::- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरिय विद्यालय, गंगापुर रोड च्या संचालिका मनीषा दीदी यांच्या संकल्पनेतून तीन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवात ध्रुवनगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. कापडणीस आणि सहकाऱ्यांनी  मधुमेह, हृदयरोग आणि ब्लड प्रेशर या आजारां बद्दल  माहिती देऊन मार्गदर्शन केले.      डॉ. कापडणीस यांनी या सर्व आजारांचे मूळ आपल्या बदललेल्या जीवनशैलीत आहे असे सांगितले, शारीरिक हालचालींचा आभाव, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी  , प्रचंड ताणतणाव , बैठी जीवनशैली, रासायनिक कीटक नाशकांचा शेतीत केला जाणार प्रचंड वापर यांमुळे हे आजार उधभवतात. काही वेळी या आजारांना अनुवंशिकता ही कारणीभूत असते असेही ते म्हणाले.  	या आजरांपासून सुटका होण्यासाठी लोकांनी आहारात बदल, विविध शारीरिक व्यायाम , नियमित शारीरिक तपासणी, दिलेल्या औषधांचे नियमित सेवन, ताणतणावांचे व्यवस्थापन, ध्यानधारणा क...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
