“ब्रह्मा कुमारी संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या पुढाकारामुळे सुदृढ आणि संस्कारक्षम समाज घडतो”- नगरसेवक दिनकर पाटील.

“ब्रह्मा कुमारी संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या  पुढाकारामुळे सुदृढ आणि संस्कारक्षम समाज घडतो”- नगरसेवक दिनकर पाटील.

न्यूज मसाला वृत्तसेवा, द्वारा सुचेता बच्छाव, बी. के. गंगापूर रोड सेंटर 
               नासिक::- ध्रुव नगर येथे आज सकाळी  ९: ०० वा. माजी नगरसेवक दिनकर  पाटील यांच्या हस्ते महाशिवरात्री निमित्त “बारा ज्योतिर्लिंग महिमा व दर्शन” आणि प्रजापिता  ब्रह्मा कुमारी इश्वरिय विश्व विद्यालय परिचय चित्र प्रदर्शनी उद्घाटन, दीप प्रज्वलन व ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. उज्ज्वल कापडणीस, डॉ. राजेश पाटील, अमोल पाटील,  जयंत महाजन आणि ब्रह्मा कुमारी संस्थेच्या मुख्य संचालिका, वासंती दीदी, परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा दीदी, संचालिका, गंगापुर  रोड यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक संजयभाई यांनी केले. दिनकर पाटील यांनी आपल्या मनोगतात या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या भूमीवर आजच्या आयोजित आध्यात्मिक उपक्रमामुळे ही जमीन पावन झाली आहे. परिसरातील नागरिकांच्या मनावर या उपक्रमाने चांगले संस्कार होऊन सामाजिक परिवर्तन होईल, व्यसनाधीनता नष्ट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाजन यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजात शांती प्रदान करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते असे मनोगत व्यक्त केले.

नाशिक विभागाच्या मुख्य संचालिका वासंती दीदी यांनी महाशिवरात्रि महोत्सवाचे महत्त्व सांगितले व  ब्रह्माकुमारी समाजात घरोघरी ज्ञानगंगा पोहोचविण्याचे कार्य करत आहेत असेही त्या म्हणाल्या. महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने उद्या दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर डॉ. उज्ज्वल कापडणीस यांच्या मार्गदर्शनखाली आयोजित केले आहे.

              या कार्यक्रमासाठी  नाशिकच्या सर्व बी के बंधू भगिनींनी उमंग उत्साहाने स्वयंसेवक बनून महाशिवरात्री महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले असे मनीषा दीदी म्हणाल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदलाल भाई, गोकुळ भाई, शांतीलाल भाई, माळी भाई, अशोक भाई, जगन्नाथ भाई यांनी उत्तम रित्या सहयोग दिला. या ३ दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाला परिसरातील नागरिकांनी भरभरून उत्तम प्रतिसाद दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!