आयडब्ल्यूएफ राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संदीप भानोसे सन्मानित !

आयडब्ल्यूएफ राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संदीप भानोसे सन्मानित !

     ठाणे/नासिक ( प्रतिनिधी)::- इमेज वेल्फेअर फोरम संस्था गेली तेवीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. तसेच आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक साहित्याचे वाटप करत परिवर्तन करत आहे.
           ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात इमेज वेल्फेअर संस्थेचा २३ वा वर्धापन दिन विविध राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून संपन्न झाला .
        नाशिकचे डॉ संदीप भानोसे उद्योग जगतात भारतभर औद्योगिक कीर्तनकार म्हणून सुपरिचित आहेत. गेली २५ वर्षे त्यांनी गुणवत्ता, उत्पादकता, सुरक्षितता, कार्य प्रेरणा, कार्य संस्कृती, कैझन, जपानी व्यवस्थापन अशा विविध विषयांवर औद्योगिक कीर्तने करून उद्योगात परिवर्तन घडविले आहे . 
तसेच २५० दुर्गांवर टाक्यांची सफाई व गडकोटांवर स्वच्छता मोहीम राबवून  परिवर्तन घडविले आहे व गेली १७८८ दिवस सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा अभियान राबवून फार मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे व त्याची दखल जागतिक विक्रमात देखील झाली आहे.

             त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना "परिवर्तन शिरोमणी " आय डब्ल्यू एफ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 व्यासपीठावर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व योग गुरु नितीन वीरखरे, श्रीमती मधुरा पंडित जसराज, अभिनेते प्रशांत दामले, शास्त्रीय संगीत मार्तंड डॉ. अजय पोहनकर, अभिनेते यशपाल शर्मा , अभिनेते आशिष चटर्जी, महाराष्ट्राची हास्य जत्राची संपूर्ण टीम, लोकमत समूहाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला, ठाणे शहर उप आयुक्त पोलीस रूपाली अंभोरे व्यासपीठावर उपस्थित होते.
           डॉ. भानोसे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की कीर्तन हे समाज प्रबोधनाचे अतिशय प्राचीन असे साधन आहे .त्याचा उद्योग जगतात समर्थपणे उपयोग करून परिवर्तन घडविता आले व उद्योगात नफा व प्रगती घडविता आली. तसेच पोवाडे, भारुडे रचून कामगारांच्या मनावर सकारात्मक परिणाम घडविता आला. त्याचा भारतातील उद्योग समर्थ बनविण्यात खारीचा वाटा उचलता आला. याचा सार्थ अभिमान वाटतो .
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराग आचार्य यांनी अतिशय खुमास धार शैलीत केले. गरुड झेप प्रतिष्ठानचे अविनाश क्षीरसागर, धनाजी जाधव, रेणू भानुसे, संचित देसाई, संदीप विनेरकर, डॉ स्वाती देसाई, व्यंकटेश देशपांडे, श्याम सुंदर देशपांडे, विभावरी देशपांडे, उज्वल मोहोळे, दिशा पुराभैया व मोठ्या प्रमाणात ठाणेकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !