महाराष्ट्र डाटबेटिस असोसिएशनची आजपासून सतरावी राज्य परिषद !


महाराष्ट्र डाटबेटिस असोसिएशनची  
आजपासून सतरावी राज्य परिषद !

 नाशिकमध्ये येणार राज्यभरातून
 ९०० हून अधिक मधुमेह तज्ज्ञ !

       नाशिक ( प्रतिनिधी ) - महाराष्ट्र राज्य डायबेटीस असोसिएशनची सतरावी राज्य परिषद दि.३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान नाशिकमध्ये हॉटेल एमराल्ड पार्क येथे होत असून या परिषदेसाठी राज्यभरातून सुमारे ९०० हून अधिक मधुमेह तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. मधुमेहावर नवनवीन उपचार पध्दती तसेच संशोधन याविषयी परिषदेत उहापोह केला जाणार असल्याची माहिती मधुमेह तज्ज्ञ व परिषद समितीचे अध्यक्ष डॉ. नारायण देवगांवकर, डॉ. समीर चंद्रात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
             परिषदेच्या पहिल्या दिवशी आज (दि. ३)  मधुमेहावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून यामध्ये अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक मधुमेहाच्या विविध पैलुंवर मार्गदर्शन करतील. दि. ३ रोजी दुपारी १२:३० वाजता परिषदेचा उद्घाटन समारंभ होणार असून आरोग्य, शिक्षण व संशोधन मुंबई संस्थेचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर उद्घाटक म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ. राहुल आहेर तसेच आंतरराष्ट्रीय मधुमेह असोसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. शशांक जोशी, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राकेश सहाय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. आज होणाऱ्या कार्यशाळेत पुणे येथील डॉ.ए.जी.उन्नीकृष्णन हे रूग्णांची रक्तशर्करा कमी जास्त झाल्यास काय करावे याविषयी मार्गदर्शन करतील. मुंबई येथील डॉ. साहीला शेख या मधुमेही रूग्णाची स्थुलता निवारण या विषयावर मार्गदर्शन करणार असून पुणे येथील डॉ. संजय अग्रवाल मधुमेही रूग्णांची शस्त्रक्रिये दरम्यान घ्यावयाची दक्षता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 
   उद्या शनिवार दि.४ रोजी मुंबई येथील डॉ. विजय पण्णीकर हे मधुमेहात औषधोपचारांचे महत्व व नव्या उपचार पध्दती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पद्मश्री डॉ. शशांक जोशी कृत्रिम बौध्दिक क्षमता याविषयी बोलतील. हृदयविकार व मधुमेह या विषयावर डॉ. नारायण देवगांवकर मार्गदर्शन करणार असून डॉ. पार्थ देवगांवकर ४० पद्व्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍नमंजुषा घेणार आहेत. रविवार दि.५ फेब्रुवारी रोजी परिषदेच्या समारोपाला अहमदाबाद येथील डॉ. बन्सी साबू, मुंबई येथील डॉ.अमीत गुप्ता, डॉ. एच.बी.चंडालिया आदी मान्यवर विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत मधुमेहावर औषधे व उपचारविषयी प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. यशपाल गोगटे व डॉ. नारायण देवगावकर व सहकारी विशेष परिश्रम घेतआहेत. पत्रकार परिषदेला डॉ. राहुल पाटील, डॉ. विजय धोंडगे, डॉ. समीर पेखळे, डॉ. पार्थ देवगावकर आदी उपस्थित होते.
*************************************
 मधुमेहाबद्दल आज नाशिककरांसाठी
विशेष उपक्रमाचे आयोजन !
   मधुमेहाबद्दल अनेक समज-गैरसमज रूग्णांच्या मनात असतात यासाठी आज शुक्रवारी (दि.३)  सायंकाळी ६ वाजता, शंकराचार्य न्यास, कुर्तकोटी सभागृह, गंगापूर रोड येथे मुंबई येथील प्रसिध्द मधुमेह तज्ज्ञ डॉ. विजय पण्णीकर, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. नारायण देवगावकर, आहारतज्ञ डॉ. रश्मी मुधोळकर - सेठी मार्गदर्शन करणार असून त्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. समीर चंद्रात्रे करणार आहेत. नाशिककरांना विनामूल्य प्रवेश व शंकानिरसन करून घेण्याची संधी मिळेल.
************************************
प्रथमोपचार कार्यशाळेचे आयोजन !
   एखाद्या व्यक्तीला अचानक श्‍वास घेण्यास अडचण येत असेल किंवा हृदयविकाराचा झटका आला असेल तर बेसिक लाईफ सपोर्टद्वारे रूग्णाला श्‍वास घेण्यासाठी मदत करू शकतो यासाठी शनिवार दि.४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७:३० ते ८:३० गोल्फ क्लब मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक येथे प्रथमोपचार कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. दरम्यान नाशिकच्या विविध झोपडपट्टी भागात मधुमेह तपासणी शिबिरे देखील घेण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!