फौजदारी संकलन शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

फौजदारी संकलन शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
 
      नासिक ::- शेवगाव जि. अहमदनगर येथील फौजदारी संकलन शाखेत कार्यरत महसूल सहाय्यक आलोसे संतोष सहदेव गर्जे यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.    

           तक्रारदार यांची दोन मुले व भाचा यास सब जेलमधून सोडण्याची मदत केल्याच्या मोबदल्यात तसेच तहसील कार्यालयात त्यांचेविरूद्ध येणा-या चाप्टर केसमध्ये मदत करण्यासाठी यातील आलोसे यांनी तक्रारदारा  कडे आज तडजोडी अंती पंचासमक्ष ४०००/- रुपयेची लाचेची मागणी करून सदर ४०००/- रुपये लाचेची रक्कम तहसील कार्यालय येथे पंच साक्षीदार समक्ष स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
           सापळा अधिकारी मिरा आदमाने, पोलीस निरीक्षक, सापळा पथक पो. ना. प्रकाश महाजन, पो. ना. प्रवीण महाजन, चालक हवा संतोष गांगुर्डे यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक, नरेंद्र पवार, वाचक, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !