विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

विस्तार अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नासिक (धुळे)::- शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी दत्तात्रेय नांद्रे, पंचायत समिती धुळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.
       तक्रारदार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदे, ता.जि. धुळे येथे प्रभारी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. दि.०७.०८.२०२५ रोजी आलोसे यांनी सदर शाळेस भेट दिली असता विद्यार्थ्यांची पट संख्या कमी असल्याने तक्रारदार यांचा वरिष्ठांना प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेस समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
   सदर तक्रारीची दि.११.०८.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी स्वतःकरीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांचेकरीता १०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे मान्य केले होते.
  त्यानंतर आज दि.१२.०८.२०२५ रोजी सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आलोसे यांनी पंचायत समिती, धुळे कार्यालयातील त्यांचे कक्षात सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचेकडुन स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द भ्र.प्रति.अधि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

टिप्पण्या

  1. शासनाने अशा प्रकरणी 3 महिनेसाठी निलंबन करून पुनश्च सेवेत येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारस खत पाणी मिळते

    उत्तर द्याहटवा
  2. अशा प्रकरणी निलंबित न करता संबंधित अपचारी यास बडतर्फ करण्यात यावे व न्यायालयीन निर्णय लागल्यानंतर सेवेत घेणेत यावे अशी तरतूद करणे आवश्यक आहे म्हणजे याला पायबंद बसू शकेल

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२५,