"लोकराजा" संपादक नरेंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न ! दिवाणखान्यात स्थान मिळविलेला दिवाळी विशेषांक - ना. बाळासाहेब क्षीरसागर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

नामदारांनी केला न्यूज मसाला संपादकाचा सत्कार !
न्यूज मसाला चा प्रसिद्ध दिवाळी विशेषांक "लोकराजा" यांस आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना २०१९ चा उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार जाहीर झाला यानिमित्ताने नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी संपादक नरेंद्र पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.
       सत्कारप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की "लोकराजा" दिवाळी विशेषांक हा सामाजिक भान ठेवत आपली वाटचाल करीत आहे. आजपर्यंतच्या प्रकाशित झालेल्या "लोकराजा" दिवाळी अंकातील साहित्य खऱ्या अर्थाने आबालवृद्धांना सामावून घेणारे व भारत सरकारच्या लोकसभा तथा राज्यसभा सदनात नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना "लोकराजा" दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान देण्याची परंपरा कायम राखत असल्याने प्रत्येक वाचकाच्या घरातील दिवाणखान्यात स्थान मिळवणारा विशेषांक ठरला आहे. भविष्यात "लोकराजा" दिवाळी अंकाची ही परंपरा कायम राखावी व समाजाला भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठ्या सणानिमित्त बौद्धिक फराळ देत राहो अशा सदिच्छा बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिल्या.
न्यूज मसाला संपादक,
लोकराजा दिवाळी विशेषांक संपादक
Mobile no. 7387 333 801

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते, बियाणे व किटकनाशके पुरवावी- सुनिल बोरकर, गुण नियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय.

उल्लेखनीय::- सगळीकडे उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही तालुक्यात आजपर्यंत एकही टँकर चालू नाही, तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायतचा पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव आलेला नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !