जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर ! न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

जनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर,
अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक
            नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर कमीत कमी कर्मचारी नाशिक जिल्हा परिषदेत कर्तव्यावर कार्यरत असून सुद्धा नाशिक जिल्हा परिषदेने जनसुविधा योजने अंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेले   रुपये (१५,६१,०४०००/-) पंधरा कोटी एकसष्ट लक्ष चार हजार निधी ग्रामपंचायत स्तरावर २५७ कामांसाठी वितरित केला आहे. सदर निधीची रक्कम ही मंजुर कामांच्या रकमेच्या साधारण ७० टक्के असून निधी कामनिहाय ग्राम पंचायतींना वितरित केला आहे. जनसुविधा योजने अंतर्गत निधी ग्रामपंचायत स्तरावर वितरीत केल्यामुळे ग्राम पंचायत स्तरावर विकास कामांना गती येणार आहे. विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करत होते. नाशिक जिल्हा परिषदेने सदरचा निधी वितरणाबाबत तात्काळ नियोजन करुन मंजुर कामांचा निधी ग्रामपंचायत स्तरावर वितरित करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
---------------------------------------------
जनसुविधा योजने अंतर्गत काम निहाय वितरित केलेल्या निधीतून तात्काळ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येऊन सदर कामे तात्काळ पुर्ण होतील व निधी वेळेत खर्च होईल या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. निधी अखर्चित राहणार नाही याबाबत गटविकास अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
--------------------------------------------    
ग्रामपंचायत स्तरावर जनसुविधा योजने अंतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे. सदर निधीतुन मंजुर जनसुविधेची विकास कामे दर्जेदार होतील यासाठी लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!