पोस्ट्स

अलकाताई आपलं चुकलंच, माफी मागितली तरीही, माफ करतील हा त्यांचा मोठेपणा समजावा लागेल !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अलकाताई आपलं चुकलंच, माफी मागितली तरीही नासिककर माफ करतील हा त्यांचा मोठेपणा समजावा लागेल ! काल नासिकच्या कालीदास कलामंदिर येथे चित्रपटाच्या पोस्टर व ट्रेलर च्या अनावरणासाठी अलका कुबल, शंतनु मोघे यांना आयोजकांनी निमंत्रित केले होते, या प्रसंगी नासिक शहरातील ख्यातनाम संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे, बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक, चित्रपट दिग्दर्शक, कलाकार, चित्रपट रसिक, पत्रकार असे मान्यवर उपस्थित होते,        "आयोजकांनी कार्यक्रमाबाबत दिनांक, वेळ, ठिकाण ठरवल्यानंतर साधा फोन केला नाही" असा जाहीर आरोप अलका कुबल यांनी रसिकांसमोर केला व तीव्र नाराजी व्यक्त करत दिड-दोन मिनिटांत तीन तास ताटकळत असलेल्या रसिकांसाठी आपला "अमुल्य" वेळ दिला.         परिचय कर्त्याने तर चक्क पाच मिनिटे यथासांग परिचय करून दिला, नासिक करांनी रसिकव्रुत्तीने टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली अन्  त्याबदल्यात कुबल यांनी रसिकांसमोर आयोजकांचे "साध्या फोनवरून" जाहीर वाच्यता करुन वाभाडे काढले याबाबत रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. नासिक च्या रसिकांची आवडती "माहेरची साडी फेम&

शिवराज्यभिषेक सोहळ्यात चीन,पोलंड,ट्युनिशिया,बल्गेरिया,ग्रीसचे राजदूत राहणार उपस्थित ! शिवराज्याभिषेक सोहळा ०६ जूनला लोकोत्सव म्हणून साजरा होत असून मोठ्या संख्येने नाशिककर होणार साक्षीदार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शिवराज्याभिषेक सोहळा ०६ जून लोकोत्सव म्हणून साजरा करणार, मोठ्या संख्येने नाशिककर होणार साक्षीदार ! चीन,पोलंड,ट्युनिशिया,बल्गेरिया,ग्रीसचे राजदूत राहणार उपस्थित नाशिक(१)::-अखिल भारतीय शिवराज्यभिषेक  महोत्सव समितीचे वतीने दुर्गराज किल्ले रायगडावर ०५ व ०६ जून २०१९ रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे, यंदा प्रथमच जागर शिवकालीन युद्धकलेचा व सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा कार्यक्रम यावर्षी आकर्षण बिंदू असणार आहे,  विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी    चीन,पोलंड,ट्युनिशिया,बल्गेरिया,ग्रीस  या पाच राष्ट्रांचे राजदूत राहणार उपस्थित राहणार आहेत. अशा या ऐतिहासिक लोकोत्सवासाठी   शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने सदस्य गणेश कदम, करण गायकर यांनी केले आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन शिवरायांनी आदर्श राज्याची घडी बसविली.

तुषार जगताप यांची नाशिक शासकीय जिल्हा रुग्णलाय समन्वय समितीवर निवड ! आजारांवरील उपचारासाठी चे सहकार्य व मार्गदर्शनसाठी संपर्क साधण्याचे आवाहन !! सविस्तर माहिती व बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पालकमंत्री नामनिर्देशित सदस्य म्हणून तुषार जगताप यांची नाशिक शासकीय जिल्हा रुग्णलाय समन्वय समितीवर निवड.      नासिक::- आरोग्यदूत म्हणून स्वतःच्या कामातून ओळख निर्माण करणारे युवक मराठा महासंघाचे तुषार जगताप यांची महाराष्ट्र शासनाने शासकीय जिल्हा रुग्णालय समन्वय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.या नियुक्तीने कामाचा खरा सन्मान झाल्याची भावना व्यक्त करताना तुषार जगताप यांनी भविष्यातही यापेक्षा अधिक गतीने रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला.       तुषार जगताप हे युवा मराठा महासंघाचे राज्य पदाधिकारी असून गरजवंत रुग्णांना तात्काळ उपचार आणि प्रसंगी आर्थिक मदत मिळवून देणे हा त्यांचा छंद आहे. सुरुवातीला व्यक्तिगत पातळीवर छंद जोपासत आपल्यासारख्या तरुणांची फळी उभी करून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्याचे काम त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून निर्माण झालेला मोठा जनसंपर्कही त्यांनी रुग्णसेवेला लिलया वाहून घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर प्रचारप्रसार झाल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी पैसे न

चित्रपटाचे निर्माते, सहनिर्माते व्हायचंय ! गुडलक एन्टरटेन्मेंट क्रिएटर्स ची अभिनव संकल्पना !! सहकारी तत्त्वावर दर्जेदार चित्रपट निर्मिती !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सहकारी तत्वावर दर्जेदार चित्रपट निर्मिती! ‘गुडलक एन्टरटेन्मेंट क्रिएटर्स’ची अभिनव संकल्पना! मराठी चित्रपट निर्मितीची सुप्त इच्छा बाळगणाऱ्या आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ‘गुडलक एन्टरटेन्टमेन्ट क्रिएटर्स’ने अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतले जाणकार अनुभवी विश्वसनीय कलावंत - तंत्रज्ञांच्या सहाय्याने नवनव्या विलक्षण कथा कल्पना असलेल्या चित्रपटांची भागीदारीत निर्मिती करण्याची सुवर्णसंधी आपणास मिळणार आहे. अपूऱ्या बजेट अभावी आपले चित्रपट निर्मितीचे स्वप्न स्वप्नच न राहता प्रत्यक्षात साकारण्यासाठी ठराविक रक्कम भरून या संस्थेद्वारे केल्या जाणाऱ्या चित्रपटाचे निर्माते, सहनिर्माते आपल्याला होता येणार आहे. कसदार कथाबीज आणि सादरीकरण असलेल्या मराठी चित्रपटांचा व्यवसाय सध्या तेजीत असून, जगभरात अश्या चित्रपटांना व्यवसायाच्या विविध संधी व पर्याय उपलब्ध असून चित्रपट निर्मितीतून नफा कमविण्याचे नवनवे मार्गही खुले आहेत. कलात्मक आणि व्यावसायिक निर्मितीचं काटेकोर नियोजन करण्यासाठी‘गुडलक एन्टरटेन्टमेन्ट क्रिएटर्स’ चित्रपटसृष्टीतील

शंभुराजेंच्या जन्मोत्सवानिमित्त रामशेज गडावर भरगच्च कार्यक्रम! छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराची घोषणा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शंभुराजेंच्या जन्मोत्सवानिमित्त रामशेज गडावर भरगच्च कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्काराची घोषणा नाशिक::-छत्रपती फाउंडेशन आयोजित अजिंक्य किल्ला रामशेज महोत्सव,छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने किल्ले रामशेज येथे  दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले असल्याची माहीती मुख्य प्रवर्तक तथा स्वागताध्यक्ष   गणेश कदम यांनी दिली.   सोमवार दि.१३ मे रोजी सायं.६ वा.या जध्कामोत्र्यसव सोहळ्याला प्रारंभ होणार असून शिवभक्तांशी संवाद साधला जाणार आहे.राञी दहा वाजता आशेवाडीच्या पायथ्यापासून निघालेली  रामशेज गड मशाल ज्योत रॕली किल्ले रामशेज गडावर विसावा घेणार आहे. मध्यरात्री १२ च्या ठोक्याला  गडावर आतिषबाजी करून छ.संभाजी राजे यांच्या जन्मक्षणाचा आनंद द्विगुणीत करण्यात येईल. मंगळवार दि.१४ मे रोजी सकाळी ९ वा.ध्वजारोहण संपन्न करून आशेवाडी चौक ते रामशेज पायथा मार्गावर पुणेरी ढोल वाद्यांच्या गजरात स.९.३० वा.पालखी सोहळा,स.१० वा.बाळासाहेब वायतोंडे यांचे शस्रकल प्रात्यक्षिके ,१०.३०वा.शाहीर स्वप्निल डुंबरे यांचे पोवाडा गायन,११ वा.पोवाडे ,दुर्ग गीत गायनासह शंभुराजेंचे पुज

शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे- डॉ.नरेश गिते ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिक –: जिल्हयातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून शैक्षणिक गुणवत्तेची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे . यापुढे शिक्षण विभागागडे आपले विशेष लक्ष राहणार असून शालेय गुणवत्तेची जबाबदारी प्रत्येक शिक्षकावरच निश्चित करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले. आरोगय विज्ञान विद्यापीठाजवळील दिल्ली पब्लिक स्कुल येथे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित 2019-20 या वर्षातील शैक्षणिक नियोजन आराखडयासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. गिते बोलत होते.            डॉ. गिते पुढे म्हणाले की, शिक्षण हा मानवी विकासाठीचा अतिशय महत्वाचा घटक असून यासाठी नियोजनानुसार काम करण्याची गरज आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी तसेच त्यांच्यात कौशल्य विकास.घडवून आणण्यासाठी प्रयत्नक करण्याबरोबरच शाळांची शैक्षणिक परिस्थिती काय आहे याबाबत सर्वेक्षण करून माहिती घेवून नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांनीही गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी

पाच वर्षांवरील मुलांसाठी न्यूट्रिलाइट डीएचए यमीज लाँच होत आहे, चवदार आणि चघळण्यायोग्य ड्रॉप्ससह पोषण घेणे मजेदार होईल-सुदीप शहा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
अॅमवे इंडिया मुलांच्या पोषणाचा पोर्टफोलिओ मजबूत करत आहे; न्यूट्रिलाइट डीएचए यमीज लाँच करत आहे चवदार आणि चघळण्यायोग्य ड्रॉप्ससह पोषण घेणे मजेदार झाले आहे मुंबई::- अॅमवे इंडिया या एफएमसीजी डायरेक्ट सेलिंग कंपनीने न्यूट्रिलाइट डीएचए यमीजचे उद्घाटन जाहीर केले आहे. हे उत्पादन 5 वर्षे आणि त्यावरील वयाच्या मुलांमधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन "डी"च्या पौष्टिकतेतील फरक भरून काढण्यासाठी विकसित केले आहे. नुट्रिलाइट डीएचए यमीजचे मऊसर जेलसारखे स्वरूप मुलांसाठी पोषक तत्वाची आवश्यकता, अधिक मजेदार आणि आनंददायक पद्धतीने पूर्ण करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. पालकांना त्यांच्या लहान मुलांच्या आवश्यक पौष्टिक आहाराची गरज भागवण्याची सोपी पद्धत म्हणजे हे नाविन्यपूर्ण चघळण्याचे सॉफ्ट ड्रॉप्स. डीएचए (डोकोसाहेक्साइनोइक एसिड) हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा एक प्रकार आहे जो मेंदूचे सामान्य कार्य आणि मुलांमधील इतर महत्वाचे कार्य करण्यासाठी मदत करतो, तर व्हिटॅमिन "डी"  हे सामान्य वाढ आणि हाडांच्या विकासासाठी आवश्यक असते, तसेच मुलांमधील रोगप्रतिकारक शक्तीला पूरक ठरते. न्यूट्रिलाइट डीएचए य

भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार' परमपूज्य स्वामी श्री माधवगिरीजी गुरु जनार्दन (मौनगिरीजी) महाराज (तपोवन, नाशिक, महाराष्ट्र) यांना ,व, ‘वेदसंवर्धन पुरस्कार' वेदमूर्ति उमेश अनंतमहाराज टाकळीकर (जि.परभणी, महाराष्ट्र) यांना घोषित, ९ मे रोजी प्रदान सोहळा-स्वामी स्वरुपानंद सरस्वती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!! 

इमेज
भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य जयंती सोहळा, पुरस्कार वितरण व ग्रंथ प्रकाशन - वैशाख शु.पंचमी गुरुवार दि. ९ मे २०१९           आदि शंकराचार्यांचे विचार आणि कार्य यांचा जनसामान्यांच्यामध्ये प्रसार करणा-या फुलगाव येथील श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर ‘भगवत्पूज्यपाद आदि शंकराचार्य पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार परमपूज्य स्वामी श्री माधवगिरीजी गुरु जनार्दन (मौनगिरीजी) महाराज (तपोवन, नाशिक, महाराष्ट्र) यांना तसेच, ‘वेदसंवर्धन पुरस्कार' वेदमूर्ति श्री.उमेश अनंतमहाराज टाकळीकर (जि.परभणी, महाराष्ट्र) यांना देण्यात येणार आहे. भारतातील वैदिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या आचारसंपन्न व्यक्तींना दरवर्षी हे मानाचे पुरस्कार देण्यात येत असून मानपत्र, सन्मानचिन्ह, महावस्त्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. | श्रुतिसागर आश्रमाच्या प्रमुख आचार्य माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली श्रीभीमाशंकर ट्रस्ट व श्रीदक्षिणामूर्ति रिलिजस् ट्रस्ट यांमार्फत गेली

नगरसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ठाणे::- येथील मीरा भाईंदर मनपाचा नगरसेवक कमलेश यशवंत भोईर, वय 50 वर्ष, प्रभाग क्रमांक 15 ड,  मिरा-भाईंदर,  ठाणे. राहणार- हरीदर्शन,  मिरागांव, ता. जि. ठाणे. व गोरखनाथ ठाकूर शर्मा,  वय-48, लेबर काँट्रॅक्टकर, राहणार - रूम नं. 2, कमलेशनगर, मिरागांव, महाजनवाडी, बाबली भाट चाळ, ता. जि. ठाणे या दोघांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारतांना काल सायंकाळी ८ वा. सुमारास ताब्यात घेतले.यातील ४२ वर्षीय तक्रारदार यांचे राहते घराचे पोटमाळ्याचे बांधकाम चालू  असुन, यातील तक्रारदार यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेची परवानगी घेतली नसून, घराचे  पोटमाळ्याचे काम चालू ठेवायचे असल्यास 25,000/- रूपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करुन, पैसे न दिल्यास महानगरपालीका अधिकारी यांना सांगून तक्रारदार यांचे राहते घराचे चालू असलेले पोटमाळ्याचे बांधकाम पाडून टाकू असे सांगून तडजोडीअंती  पहिला हप्ता म्हणून रू.  10,000/-  लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून, सदर लाचेची रक्कम खाजगी ईसम यांचेकडे देण्यास सांगून,  आरोपीत नं 2 खाजगी ईसम यांनी सदर लाचेची रक्कम  आलोसे यांचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडून

पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या शहराध्यक्ष पदी श्यामभाऊ जांबोलीकर यांची तर शहर सचिव पदी दिपक साठे यांची निवड !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या उल्हासनगर शहराध्यक्ष पदी श्यामभाऊ जांबोलीकर यांची तर शहर सचिव पदी दिपक साठे यांची निवड !!! बदलापूर, प्रतिनिधी : युनायटेड इंडियन्स पार्टीची सभा बदलापूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या सभेत श्यामभाऊ जांबोलीकर यांची उल्हासनगर शहराध्यक्ष तर दिपक साठे यांची शहर सचिव पदी तसेच बदलापूर शहर सचिव पदी अमर साखर्डे यांची निवड करण्यात आली आहे . युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांनी माहिती देताना सांगितले की सद्या फक्त शहर पातळीवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत व निवड केलेल्यांना त्यांचे कार्य बघून त्यांची तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर नियुक्ती करण्यात येणार आहे . युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय सचिव संभाजी जाधव यांनी सांगितले की युनायटेड इंडियन्स पक्ष हा देशप्रेमी संघठीत भारतीयांचा पक्ष आहे व ह्या पक्षात कुठल्याही प्रकारचा जातीयवाद होत नाही . तसेच सर्व धर्माच्या बांधवांचे पक्षात स्वागत करण्यात येईल . युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार ओमकार सुब्रमण्यम यांनी नवनियुक्त पदाधिकार्

निवडणूक कर्मचाऱ्यास तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल करून केले उपचार !! मतदान केंद्रांवरील आरोग्य सुविधेचा डॉ. नरेश गिते यांनी दिवसभर घेतला आढावा !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
             नाशिक –लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद अंतर्गत येणा-या सर्व मतदान केंद्रांमध्ये आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्गत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मोहगाव ता नाशिक येथील बुथवरील कर्मचारी श्री. मावळे यांना किडणीस्टोन चा त्रास झाले कारणाने त्यांना तातडीने शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार करण्यात आले. उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून सर्व आरोग्य यंत्रणा सूसज्ज ठेवण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी  व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे  प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा पुरविण्याचे तसेच तालुका व इतर ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आदी कर्मचारी सकाळपासूनच मतदान केंद्रात उपस्थित होते. प्रत्येक केंद्रात आरोग्य विभागाने स्टॉल लावला होता. यामध्ये विविध प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यात आली होती. उष्माघाता बाबत मतदारांना माहिती देण्यात येत होती.आरोग्य विभागाच्या वतीने ॲम्बुलन्स सेवाही तयार

हिटलरशाहीचा पाडाव करून समीर भुजबळ यांना विजयी करा - अण्णासाहेब कटारे! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
हिटलरशाहीचा पाडाव करून  समीर भुजबळ यांना विजयी करा -  अण्णासाहेब कटारे   नाशिक,दि.२५ एप्रिल :-  शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला, सर्व समावेशक समाजव्यवस्थेचा भक्कम पाया असलेल्या, संविधानाच्या माध्यमातून समर्थपणे उभा राहिलेला आपला देश आहे.  २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर स्वकेंद्रित विचारांच्या गर्तेत अडकलेल्या पक्षांच्या हाती गेला आणि त्यानंतर संपूर्ण देशात घडत गेलेल्या घटना, घडामोडी यांनी देशातील राजकीय, सामाजिक,आर्थिक, नियोजन, न्यायव्यवस्था,व्यक्ती व विचार स्वातंत्र्य अशा सर्वच घटकांवर अंकुश ठेवण्याचे काम केले जात असल्याने हिटलरशाहीचा पाडाव करून समीर भुजबळांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले आहे.             खा.शरदचंद्र पवार यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली प्रांत, राज्य,वर्ण, अन्न इत्यादी विविधता असलेल्या सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जनसहभागातून विकासाची परंपरा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष व भुजबळ कुटुंबिय यांच्या संस्कारातून उभे र

गोडसे यांच्या प्रचारार्थ शहरात दुचाकी रॅलीचा झंझावात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
   गोडसे यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅलीस मोठा प्रतिसाद         नाशिकः लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप व शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ  काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो तरुणांनी मोटारसायकलवर स्वार होत गोडसे यांच्या प्रचारात सहभाग घेतला. मोटारसायकलला लावलेले भगवे झेंडे, गळ्यात भगवी मफलर, डोक्यावर भगवी टोपी, मनगटात भगव्या रंगाची पट्टी व खिशाला अडवलेला धनुष्य बाणाचा बिल्ला अशा थाटात शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले होते. तर महायुतीतील रासपाचा पिवळा, रिपाईचा निळा व भाजप-सेनेचा भगवा अशा विविध रंगी झेंड्यानी शहरातील रस्ते सजले होते.         सकाळी नऊच्या सुमारास अशोक स्तंभ येथील ढोल्या गणपती मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या रॅलीस प्रारंभ करण्यात आला. रस्त्यात ठिकठिकाणी या रॅलीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. त्या त्या भागात रॅली आल्यावर तेथील तरुण दुचाकीवरस्वार होऊन या रॅलीत सहभागी होत होते. अनेक ठिकाणी उमेदवार  खा. गोडसे यांचे सुवासिनींनी औक्षण केले. महायुतीची ही रॅली रुंग्ठा हायस्कूल

बिनचेहऱ्याची आघाडी पापं करूनही निर्लज्जपणे सामोरे येते, काॅग्रेसचे घोटाळे सुद्धा आदर्श घोटाळे आहेत-उद्धव ठाकरे ,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकः  ज्यांनी सत्तर वर्षे देश लुटून खाल्ला, देशातील जनतेला पिळवलं त्या काँग्रेस व राष्ट्रवादीची बिन चेहऱ्याची आघाडी आहे. एवढी पापं करुनही ते पुन्हा निर्लज्जपणाने सामोरे येत आहे. त्यांनी हजारो कोटींचा घोटाळा करुन देशाचा सत्यानाश केला. आम्ही देव, देश व धर्मासाठी एकत्र आलो आहोत. देशाच्या हितासाठी युती केली आहे. ही भगवी वज्रमूठ पक्की असून कोणीही तिला टक्कर देऊ शकणार नाही. इथे इनाम राखणारी माणसं आहेत. एक दिशा आहे एक विचार आहे व एक नेता आहे. काश्मीरमधील ३७० कलम काढणार असून देश द्रोह्यांना फासावर लटकावणार असून आम्ही राममंदीर बांधणारच असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.          नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवर हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ येथील अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर रंजना भानसी , राज्यमंत्री दादा  भुसे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना जिल्हा संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, भाजपाचे वरीष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सेनेचे

समीर भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे -- अनिता भामरे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नासिक (प्रतिनिधी) विकसनशील शहरांच्या यादीत असलेले नासिक शहर हरवले, यावर उपाय म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच मतदारांनी निवडून आणावे असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी  केले         विकसनशील शहरांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर असलेले नासिक भाजपा सरकारच्या काळात हरवले आणि विकासात मागे पडले म्हणून नासिक शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार समीर  भुजबळ यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे  आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी मतदारांना केले. केवळ मोठमोठ्या घोषणा करून सर्व सामान्य जनतेला फसवून भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. मात्र गेल्या पाच वर्षांत ह्या सरकारने कुठल्याही प्रकारचे जनतेच्या हिताचे ठोस निर्णय घेतले नाही यामुळे जनतेच्या मनात राग आहे. शेतकरी कर्जमाफी नाही, युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, नोटबंदी, अशा विविध कारणांमुळे जनता हवालदिल झाली आहे असे भ

लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड ! गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
लोकोपयोगी कामांमुळे गोडसेंची प्रतिमा उंचावली- प्रा. गायकवाड                 खा. गोडसे यांनी केटीएचएम व एचपीटी महाविद्यालयात साधला संवाद           नाशिकः  खा. हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांत चांगली कामे केली आहेत. ते सुसंस्कृत, सुस्वभावी, हुशार व चांगली वर्तणूक असलेला विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयात त्यांचा लौकिक आहे. लोकोपयोगी कामांमुळे जनमाणसांत गोडसे यांची प्रतिमा उंचावली असून ते मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या केटीएचएम इंजिनिअरींग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यांची महाविद्यालयाशी नाळ जोडली आहे. या महाविद्यालयातील सर्व सेवकवृंद त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहातील असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य  व्ही. बी. गायकवाड यांनी केले. प्रचार दौऱ्यानिमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.            प्रारंभी महाविद्यालयाच्यावतीने गोडसे यांचे स्वागत करण्यात आले. गोडसे यांनी माझी उमेदवारी याबाबत प्राध्याकांशी संवाद साधला. त्यानंतर गोडसे यांनी कॉलेज रोडवरील एचपीटी कॉलेजमध्ये जा

तरूणांनो आयुष्यातील अनुपम जोडीदाराच्या शोधात आहात काय ? मग, २९ एप्रिल रोजी मतदान करा ! मोफत मेंबरशीप मिळवून अनुपम जोडीदार निवडा !!! सुवर्ण संधीच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
मतदारांसाठी अनुपम डॉट कॉमतर्फे सुवर्णसंधी मतदान करा...मोफत सदस्यत्व मिळवा  नाशिक - लोकसभेसाठी नाशिकसह मुंबई, ठाणे येथे २९ एप्रिलला मतदान होत आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे तसेच विशेषतः लोकशाही प्रक्रियेत प्रथमच सहभागी होणाऱ्या तरूणाईसाठी म्हणजेच मतदारांकरिता नाशिकच्या प्रख्यात अनुपम डॉट कॉम या विवाह संस्थेतर्फे प्रोत्साहनपर योजना घोषित करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे ,नाशिक सहीत पुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अनुपमशादी डाॅट काॅम या अग्रगण्य विवाहसंस्थे तर्फे मतदान करणा-यासांठी एक अफलातून योजना तयार करण्यात आली. यामधुन अनेकांचे लग्न जमणार आहेत. नाशिक,मुंबई व ठाणे येथे दिनांक २९ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान आहे. सर्वांनी मतदान करावे असे आवाहन अनुपमशादी डाॅट काॅम तर्फे करण्यात येत आहे. जे मतदार मतदान करतील व  विवाहइच्छुक असतील त्यांना अनुपमशादी तर्फे  रु 1500 ची मेंबरशिप ही थेट मोफत देण्यात येणार आहे. अनुपमशादी डाॅट काॅम तर्फे घेण्यात आलेल्या अनेक विवाहमेळाव्यातुन व www.anupamshaadi.com/  या ऑनलाईन वेबसाईट वरुन हजारोंचे विवाह जुळले आहेत. मतदानाच्या  दिवशी दि. 29  ए

शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांच्याकडून जनतेस सद्वविवेकपणे मतदान करण्याचे आवाहन ! कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला पाठिंब्याचा प्रश्न नाही !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
शहर-ए-खतीब यांच्याकडून जनतेस आवाहन ! नासिक ::- शहर-ए-खतीब हे मुस्लीम समुदायाचे सेवक म्हणून कार्य करीत असतात, त्यामुळे राजकीय निवडणुकीत या पदाचा काहीएक संबध  नसतो, त्याचप्रमाने आम्ही कोणत्याही राजकीय पक्षासोबत  कधीच नव्हतो, आजही नाही, आणी भविष्यातही राहणार नाही, आम्ही फक्त आणी फक्त समाजाचे सेवक या नात्याने कार्यरत असतो, मात्र सध्या होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमधील निवडणुकीसाठी असलेले बहुतेक उमेदवार आमच्या सदीच्छा व आशिर्वादपर भेटीसाठी येतात याचा अर्थ आम्ही एखाद्या राजकीय पक्षासोबत आहोत असे समजणे गैर आहे. भेटीचा विषय कुण्या राजकीय पक्षाबरोबर वा राजकीय व्यक्तीसोबत जोडून जनतेत चुकीचा संदेश पाठविला जात असेल तर अशा अफवांना समाजाने बळी पडू नये, लक्ष देऊ नये, आपल्या लोकशाही मुल्यांचा हक्क अबाधित ठेऊन सद्विवेक बुद्धीने अंतरात्म्याचा आवाज सांगेल त्या उमेदवाराला मतदान करा. लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा,  भारतीय नागरिक आहोत तर महत्वपूर्ण तथा गंभीरतेने मतदानाचे कार्य प्रत्येकाने पूर्ण करावे, असे आवाहन नासिक शहर-ए-खतीब अलहाज हुसामूद्दीन अशरफी यांनी एका पत्रकाद्वारे

माझ्याविषयी कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्येधाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
माझ्याविषयी  कटकारस्थाने करणाऱ्यांना जेलमध्ये धाडल्याशिवाय राहणार नाही- छगन भुजबळ नाशिक, दि.२३ एप्रिल :- माझ्यावर आणि समीर भुजबळ वर केलेले आरोप सर्व खोटे असुन त्याबाबतचा तसा अहवाल न्यायालयाकडुन तर येईल. मग त्यानंतर मात्र माझ्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांना मी जेल मध्ये धाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे झालेल्या जाहीर देत भाजपचा चांगलाच समाचार घेतला.          ते पुढे म्हणाले की,  प्रत्येकजण स्वत:ला विकासपुरुष, कार्यसम्राट म्हणून घेत असतांना सिन्नर तालुक्यात १० वर्षे आमदारकी काळात तुम्ही  स्वतः काय विकास केला असा सवाल करत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल तर  तो फक्त मी आणि  समीर भुजबळ यांच्या निधीतुन विकास केला आहे असे सांगत एक बस स्टँड बांधुन त्याचे गाळे भाड्याने देऊन किंवा विकुन आपली दुकानदारी केलेली नाही. सिन्नरच्या विकासासाठी समीर भुजबळ यांनी निधी उपलब्ध करुन दिला  आहे.  त्यामुळे कुणीही खोटे बोलु नये असे सांगून कोकाटेवर चांगलेच  तोंडसुख घेतले.            पिंपळगांव येथे झालेल्या प

नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नाशिकरोड विभागात समीर भुजबळ यांच्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग नाशिक,दि.२३ एप्रिल :- राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ  यांच्या प्रचारार्थ नाशिकरोड विभागात काढण्यात आलेल्या मोटार सायकल रॅलीमध्ये महिला, तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी शकडो महिला व तरुण आपल्या  मोटार सायकल घेऊन रॅलीमध्ये सहभागी होत समीर भुजबळ यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन करत होते. त्याअगोदर समीर भुजबळ यांनी सकाळी संभाजी स्टेडीयम  सिडको येथील मॉर्निग वॉक साठी आलेल्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.         आज सकाळी नाशिकरोड येथील बिटको चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे जेलरोड, भीम नगर, गारगोटी बंगला,  कॅनॉल रोड,  पवारवाडी,  भगवती लॉन्स,  पंचक गाव, राजराजेश्वरी चौक,  ढिकले मळा,  शिवाजी नगर,  निरगुडे हॉस्पिटल, सैलानी बाबा,  दसक,  सैलानी बाबा, मारुती मंदिरा जवळून उपनगर नाका,  कॅनॉल रोड टाकीवर,  सिन्नर फाटा,  विष्णू नगर, तसेच  एकलहरा रोड,  गोरेवाडी,  ट्रॅक्शन कॉलनी रोड,  पॉलीटेक्निक रोड,  सिन्नर फाटा, चेहड

सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठीसमीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सिन्नर तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून द्या - छगन भुजबळ नाशिक,दि.२३ एप्रिल :- सिन्नर तालुक्यातील बहुतांश गावातील मुख्य पाण्याची आणि शेती समस्या आहे. आगामी काळात सिन्नर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी  केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी समीर भुजबळ यांना निवडून आणा असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिन्नर तालुक्यातील वावी येथे झालेल्या जाहीर सभेत केले.        यावेळी छगन भुजबळ म्हणाले की,  सिन्नर तालुक्याचे सतत दहा वर्षे आमदार म्हणून काम करणार्याह कोकाटेंनी त्यांच्या दहा वर्षांत सिन्नर तालुक्यातील नागरिकांवर अन्यायच केला असून अशा अन्यायकारक आणि नाकर्तेपणाची भुमिका घेणा-या कोकाटेना सिन्नरकरांचा आता काय अचानक पुळका आल्याचे सांगत यावेळी कोकाटेना सिन्नरकर नाकारल्या शिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी  सांगीतले.            यावेळी डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासारखे कर्तबगार नेतृत्व आजच्या घडीला नाशिक जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रातही सापडणार नाही समीर भुजबळ यांच्याकडे प्रगत

उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज अनंत कान्हेरे मैदानावर नाशिक येथे सभा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
उध्दव ठाकरे, सतपालजी महाराज यांची आज नाशिक येथे सभा नाशिकः  नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दि. २४ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व भाजपाचे स्टार प्रचारक तथा उत्तराखंडचे पर्यटन विकास मंत्री सतपालजी महाराज यांची सभा शहरातील अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे. सभेस महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. या सभेत उद्धव ठाकरे आणि सतपालजी महाराज काय मार्गदर्शन करतात याकडे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.        यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन,शिवसेना उपनेते बबनराव घोलप, भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गिते, भाजपाचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर रंजनाताई भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतलताई सांगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, रासपाचे जिल्हाध्यक्ष अरुण आव

गोडसेंचा एकलहरे गटात झंझावाती प्रचार दौरा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसेंचा एकलहरे गटात झंझावाती प्रचार दौरा ! नाशिकः महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ काल शिवसेना उपनेते बबनराव घोलप, आ. योगेश घोलप, जि.प. सदस्य शंकरराव धनवटे, तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के आदींच्या नेतृत्वाखाली एकलहरे गटात झंझावाती दौरा करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात एकलहरे गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दौऱ्यात सहभागी झालेल्या नेत्यांनी जास्तीत जास्त मतदान करुन टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. ग्रामीण भागातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. सकाळी एकलहरे येथून सुरुवात झालेल्या या प्रचार दौऱ्यात सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, मोहगाव, बाभळेश्वर, बेलतगव्हाण, संसरी, शेवगे दारणा, नानेगाव, दोनवाडे, राहुरी, लहवित , लोहशिंगवे, वंजारवाडी आदी गावांमध्ये प्रचार करताना घोलप यांनी गत पाच वर्षातील गोडसेंच्या कामाचा आलेख सादर करत भागाच्या विकासासाठी युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी अजिंक्य गोडसे, पं.स. सदस्य अनिल जगताप, डॉ. मंगेश सोनवणे, शाखाप्रमुख शांताराम राजोळे, मधुशेठ कापसे, योगेश म्हस्के, सचि

गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिला विजयाच्या शुभेच्छांसह आशिर्वाद ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसे यांना समस्त बोहरी समाजाने दिल्या विजयाच्या शुभेच्छा !           नाशिक- लोकसभा निवडणुकीतील प्रचारात चांगलीच रंगत वाढली असून शिवसेना-भाजप व रिपाई, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना विविध स्तरातून वाढणाऱ्या पाठिंब्यामुळे विरोधकांची डोकेदुःखी वाढू लागली आहे. मंगळवारी सकाळी येथील बोहरी व वाल्मिकी समाजातील मान्यवरांच्या गोडसे यांनी भेटी घेतल्या. यापूर्वी विविध समाज-संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास समाजाच्या नेत्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केला.          येथील बोहरी समाज संघटनेच्या बारुल इमारत येथे गोडसे यांना विजयीभवच्या शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उमेदवार गोडसे यांना समाजाचे धर्मगुरु मुस्ताली भाईसाहेब यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्वस्तरातून गोडसे यांना मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे या निवडणुकीत आपले पारडे जड ठरेल असा विश्वास समाजाच्यावतीने व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार देवयानी फरांदे, प्रथमेश विसे, चंद्रकांत

ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचा समीर भुजबळ यांना पाठींबा जाहीर नाशिक,दि.२२ एप्रिल :- नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना ओबीसी एनटीपार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांची भेट घेऊन आपला पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी भरत सोनवणे उपस्थित होते, अशी माहिती भुजबळ यांच्या कडून देण्यात आली.              ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया कडून देण्यात आलेल्या पाठींबा पत्रात  म्हटले आहे की, भारतीय जनगणना आयोग भारत सरकारतर्फे ओ.बी. सी. समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी याचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच नाशिक जिल्ह्याचा सर्वागीण विकासासाठी भटक्या विमुक्त ओबीसी समाजाच प्रतिनिधित्व करणारी संघटना ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया नाशिक लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पार्टी आघाडीचे उमदेवार समीर भुजबळ यांना जाहीर पाठींबा देत असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक देण्याचा निर्धार करीत आहे.              

मुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठीसमीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
मुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठी समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे नाशिक,दि.२२ एप्रिल :- मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले आहे. तसेच देवळाली भगूर येथून समीर भुजबळ यांना मोठी आघाडी मिळवून देऊ असे त्यांनी म्हटले आहे.              त्यांनी म्हटले आहे की, नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. जर्मन टेक्नोलॉजी असलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉली ही देशात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर  बसविली,  गंगापूर गावानजीक बचतगटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी दिल्ली हाट च्या धर्तीवर कलाग्राम उभारले.  मात्र युतीच्या खासदाराने केवळ भुजबळांचे नाव मोठे होईल म्हणून त्यांनी उद्घाटन देखिल केले नाही अशा या नाकर्त्या लोकप्रतिनिधीला नाशिककर घराचा रस्ता दाखविल्या

भगूर परिसरातून गोडसेंना विक्रमी मताधिक्य देणार – विजय करंजकर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
भगूर परिसरातून गोडसेंना विक्रमी मताधिक्य देणार – करंजकर             नाशिक-   स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहर व परिसर हा भगव्याचा पाईक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागाने शिवसेनेची पाठराखण केली असून शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणुकीतही ही परंपरा कायम रहाणार आहे. महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना भगूर पंचक्रोशीतून विक्रमी मते देणार आहे. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदार संघ हा गोडसे यांना सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदार संघ ठरणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी व्यक्त केला.                    भगूर येथे शिवसेना, भाजपा, रिपाई , रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खा. गोडसे यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात करंजकर बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा अनिता करंजकर, भाजपा तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, विधानसभा प्रमुख केशव पोरजे, कॅन्टोन्मेंट नगरसेवक बाबुराव मोजाड, युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपु

२४ एप्रिल रोजी गिरणारेत शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारेत शरद पवार यांची जाहीर सभा नाशिक,दि. २१ एप्रिल :- प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत दि.२४ एप्रिल रोजी महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गिरणारे येथे जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, यांच्या जाहीर सभा होणार असून डॉ.अमोल कोल्हे यांची प्रचार रॅली होणार आहे.

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
सिडकोतील मोटारसायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद शनिवारी सिडको, अंबड भागात मोटारसायकल प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेले उमेदवार खा.गोडसे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी यांचे औक्षण करुन शुभेच्छा दिल्या. या प्रचार रॅलीचा माहोल एवढा उत्साही दिसून आल्याने गोडसे यांना विजयाकडे घेऊन जाणारा ठरणार असून सर्वाधिक मताधिक्य सिडकोतून मिळणार असल्याचा विश्वास आमदार सिमाताई हिरे, सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.  सकाळी ९ वाजता खा. गोडसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे लावलेल्या मोटारसायकली घेऊन प्रचार रॅली काढली.  सिडको विभागातील शिवाजी चौक, अंबड पोलीस ठाणे, गोविंदनगर, मोरवाडी, अंबड गाव, राणेनगर, पाथर्डी फाटा, खुटवटनगर आदी भागात ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवाजी चुंभळे, कल्पनाताई पांडे,  बंटी तिदमे, डी. जी. सुर्यवंशी, बाळासाहेब पाटील, जगन पाटील, किरण गामणे, किरण दराडे, कल्पानाताई चुंभळे, मुकेश शहाणे, कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, दिलीप दातीर, अलका अहिरे, दीपक दातीर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गोडसेंच्या विजयात देवळालीचा सर्वोच्च वाटा असणार-बबनराव घोलप ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
गोडसेंच्या विजयात देवळालीचा सर्वोच्च वाटा-घोलप           नाशिक- नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी देवळाली मतदार संघात झंझावाती दौरा करण्यात आला. गोडसेंच्या विजय निश्चित असून त्यांच्या विजयात देवळाली मतदार संघाचा सर्वोच्च वाटा राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते व माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.           एकलहरे गटात शनिवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी आयोजित दौऱ्यात घोलप यांनी ठिकठिकाणी मार्गदर्शन केले. सिद्ध पिंप्री, लाखलगाव, गंगापाडळी, कालवी, ओढा, शिलापूर, माडसांगवी, विंचूर गवळी, सुलतानपूर, जाखोरी, चांदगिरी, शिंदे, पळसे या गावांत घरोघरी तसेच मळे विभागात जाऊन गोडसे यांचा प्रचार केला. यावेळी गावागावांत युतीचे नेते व पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खा. गोडसे व आ. योगेश घोलप यांनी केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांनी गोडसे यांना दिल्लीत पाठविण्याचा निर्धार केल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवले. दौऱ्यात उपनेते घोलप यांच्यासह आ. योगेश घोलप, जि.प. सदस्य शंकरराव धनवटे, उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आग

हेमंत गोडसे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ--मा.आमदार काशिनाथ मेंगाळ, नगराध्यक्ष लोहगावकर यांनी केला विश्र्वास व्यक्त ! त्र्यंबक तालुका गोडसेंच्या पाठीशी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
त्र्यंबकेश्वर तालुक्याची ताकद गोडसेंच्या पाठिशी नाशिक- नाशिक लोकसभा मतदार संघातील गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले निष्कलंक, सुसंस्कारी, मितभाषी व विकास कामे करणारे सक्रिय खासदार म्हणून हेमंत गोडसे यांचा लौकिक आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्यातून त्यांच्याच नावाला पसंती मिळत असल्याने त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास माजी आमदार काशिनाथ मेंगाळ व त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी व्यक्त केला. तालुक्यातील हरसूल, वाघेरा व ठाणापाडा या जिल्हा परिषद गटात शुक्रवारी झालेल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ठिकठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते.     त्र्यंबकेश्वर तालुक्यातील  हरसूल, वाघेरा व ठाणापाडा या तीन जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये झालेल्या प्रचार सभांमध्ये उभय नेते बोलत होते. मेंगाळ व लोहगावकर यांनी नाशिक शहरासह सिन्नर, इगतपुरी तालुक्यांमध्ये गोडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडूण देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुकाही या कामासाठी मागे रहायला नको म्हणून आपणही गोडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडूण देऊ असे प्रतिपादन मेंगाळ व लोह

वकिल, ब्राम्हण, सुवर्णकार संघटनांचे गोडसेंना पाठबळ! समाजातील अनेक स्तरातून गोडसेंना पाठिंबा; विजय निश्चित असल्याचा दावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

इमेज
वकिल, ब्राम्हण, सुवर्णकार संघटनांचे गोडसेंना पाठबळ       सर्वच स्तरातून पाठिंबा; विजय निश्चित असल्याचा दावा           नाशिक- लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यात प्रचारात रंगत वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राजकीय घडामोडींनी मतदार संघ ढवळून निघाला आहे. या मतदार संघातील सेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना वकिल संघ, ब्राम्हण समाज व सुवर्णकार समाज संघटनासह सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. विविध संघटनांचे पाठबळ महायुतीच्या गोडसेंना मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले असून महायुतीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे.              निवडणुकीच्या शेवटच्या चरणातील प्रचाराला वेग आला आहे. प्रचारातील महत्वाच्या टप्प्यात शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाईं, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार गोडसे यांना नाशिक शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांचे पाठबळ मिळाले आहे. सुरुवातीपासून त्यांना सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत होता. गावोगावी झालेल्या प्रचार फेऱ्या, गाठिभेटी, नेत्यांच्या सभा, मेळावे यांना उत्स्फूर्तपणे होणारी गर्दी, मतदारांचा मिळणारा सकारात्मक कौल, ठिकठिकाणी हो

गोडसें यांना आर्य सोमवंशी समाजाचा जाहीर पाठिंबा!                मोटारसायकल रॅली ठरले नाशिकमधले आकर्षण !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
         गोडसें यांना आर्य सोमवंशी समाजाचा जाहीर पाठिंबा                 मोटारसायकल रॅली ठरले नाशिकमधले आकर्षण नाशिक- लोकसभा निवडणुकीतील सेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ  गुरुवारी सकाळी काढण्यात आलेली मोटारसायकल  रॅली शहरातील चर्चेचा विषय ठरली. झेंडे-पताका, भगव्या  टोप्या व उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते सहभागी झाल्याने या भागातील अवघे वातावरण भगवेमय झाले होते. ठिकठिकाणी या रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात येत होते.  दरम्यान, या रॅलीच्या प्रारंभीच आर्य क्षत्रिय सोमवंशी समाजाच्यावतीने  उमेदवार हेमंत गोडसे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आल्याचे समाजाच्यावतीने घोषीत करण्यात आले.  त्यामुळे सकाळीसच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढीस लागला. शिवसेना, भाजप, आरपीआय (आ.) रासप व शिवसंग्राम या महायुतीच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॉलीस मिळालेल्या नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. तरुण बाईकस्वार कार्यकर्त्यांच्या गर्दीने व भगव्या रंगाच्या झेंड्यांनी रॅलीत चांगलाच रंग भरला होता. सकाळी आर्य क्षत्रिय सोमवंशी मंगल

नाशिक येथे आज निलमताई गोऱ्हे, नितीन बानगुडे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सभा ! मराठा समाज, नोटप्रेस युनियन व बेलदार समाजाचा हेमंत गोडसे यांना पाठिंबा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
     नाशिक येथे आज निलमताई गोऱ्हे, नितीन बानगुडे यांच्या सभा नाशिक- लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजपा, आरपीआय, रासपा व शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दि. १७ एप्रिल रोजी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक, नाशिकरोड व सातपूर येथे महिला नेत्या निलमताई गोऱ्हे व शिव चरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. नाशिक येथील गंगापूर रोड वरील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी चार वाजता निलमताई गोऱ्हे महिला मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा सातपूर येथील अशोकनगर, पोलीस चौकीजवळ सायंकाळी पाच वाजता तर नाशिकरोड येथील जेलरोड भागातील गणेश व्यायामशाळेजवळ त्रिमुर्ती चौक येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास  शिवसेना उपनेते बबनराव घोलप, भाजपाचे लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, वसंत गिते, आ. बाळासाहेब सानप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महापौर