पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या शहराध्यक्ष पदी श्यामभाऊ जांबोलीकर यांची तर शहर सचिव पदी दिपक साठे यांची निवड !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

पार्टी ऑफ युनायटेड इंडियन्स च्या उल्हासनगर शहराध्यक्ष पदी श्यामभाऊ जांबोलीकर यांची तर शहर सचिव पदी दिपक साठे यांची निवड !!!
बदलापूर, प्रतिनिधी : युनायटेड इंडियन्स पार्टीची सभा बदलापूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या सभेत श्यामभाऊ जांबोलीकर यांची उल्हासनगर शहराध्यक्ष तर दिपक साठे यांची शहर सचिव पदी तसेच बदलापूर शहर सचिव पदी अमर साखर्डे यांची निवड करण्यात आली आहे .
युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांनी माहिती देताना सांगितले की सद्या फक्त शहर पातळीवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत व निवड केलेल्यांना त्यांचे कार्य बघून त्यांची तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर नियुक्ती करण्यात येणार आहे .
युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय सचिव संभाजी जाधव यांनी सांगितले की युनायटेड इंडियन्स पक्ष हा देशप्रेमी संघठीत भारतीयांचा पक्ष आहे व ह्या पक्षात कुठल्याही प्रकारचा जातीयवाद होत नाही . तसेच सर्व धर्माच्या बांधवांचे पक्षात स्वागत करण्यात येईल .
युनायटेड इंडियन्स पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार ओमकार सुब्रमण्यम यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन केले व पक्षाचे ध्येय धोरण स्पष्ट केले .
ओमकार सुब्रमण्यम पुढे म्हणाले की आजघडीला देशातील प्रत्येक पक्ष हा भ्रष्टाचाराने व जातीवादाने बरबटलेले आहेत तसेच प्रत्येक पक्षात घराणेशाही आहे . सामान्य कार्यकर्त्यांची दखल घेतली जात नाही , ह्याच सर्व बाबींचा विचार करून आम्ही दिल्लीला रजिस्ट्रेशन करून युनायटेड इंडियन्स पार्टी ह्या संघठीत भारतीयांचा पक्ष म्हणून स्थापना केली आहे .
ज्यांना खरोखरच समाजसेवेची तळमळ आहे व आगामी विधानसभा निवडणूक लढवून देशाची व गोरगरीब जनतेची सेवा करायची मनापासून इच्छा असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने युनायटेड इंडियन्स पक्षात सामिल व्हावे व आपले बहुमुल्य योगदान देशसेवेसाठी द्यावे असे आवाहन युनायटेड इंडियन्स पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बहादरे यांनी केले .
याप्रसंगी बदलापूर शहराध्यक्ष श्रीनिवास पाठक , ठाणे शहर सचिव संतोष हरावडे , बदलापूर वॉर्ड क्रमांक 34 अध्यक्ष अविनाश ढाणे व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड

पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न !

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाची यात्रेदरम्यान रोज सजावट ! मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीतून सजावट करण्याचे अवघड कार्य !