वकिल, ब्राम्हण, सुवर्णकार संघटनांचे गोडसेंना पाठबळ! समाजातील अनेक स्तरातून गोडसेंना पाठिंबा; विजय निश्चित असल्याचा दावा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

वकिल, ब्राम्हण, सुवर्णकार संघटनांचे गोडसेंना पाठबळ
      सर्वच स्तरातून पाठिंबा; विजय निश्चित असल्याचा दावा
          नाशिक- लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यात प्रचारात रंगत वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राजकीय घडामोडींनी मतदार संघ ढवळून निघाला आहे. या मतदार संघातील सेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांना वकिल संघ, ब्राम्हण समाज व सुवर्णकार समाज संघटनासह सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. विविध संघटनांचे पाठबळ महायुतीच्या गोडसेंना मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले असून महायुतीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे.
             निवडणुकीच्या शेवटच्या चरणातील प्रचाराला वेग आला आहे. प्रचारातील महत्वाच्या टप्प्यात शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाईं, रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार गोडसे यांना नाशिक शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटनांचे पाठबळ मिळाले आहे. सुरुवातीपासून त्यांना सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत होता. गावोगावी झालेल्या प्रचार फेऱ्या, गाठिभेटी, नेत्यांच्या सभा, मेळावे यांना उत्स्फूर्तपणे होणारी गर्दी, मतदारांचा मिळणारा सकारात्मक कौल, ठिकठिकाणी होणारे स्वागत हे वातावरणच विजयाकडे घेऊन जाणारे दिसत आहे. त्याला विविध संघटनांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे पुष्टी मिळाल्याची किनार लाभल्यामुळे गोडसेंचा विजयमार्ग सुकर होताना दिसत आहे.
            नाशिक जिल्हा वकिल संघ तसेच नाशिक डिस्ट्रीक ॲडव्होकेट मल्टी पर्पज को. ऑपरेटीव्ह सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व सभासदांच्या गोडसे यांनी गाठीभेटी घेतल्या यावेळी या दोन्हीही संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गोडसे यांनाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रारंभी येथील ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे, का. का. घुगे, यांचे आशिर्वाद घेऊन सर्वांच्या गाठिभेटी घेतल्या.  या प्रसंगी वकिल संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, उपाध्यक्ष प्रकाश आहुजा, सचिव जालिंदर ताडगे, संजय गिते तसेच ॲडव्होकेट मल्टी पर्पज को. ऑपरेटीव्ह सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग तिदमे, सेक्रेटरी रमेश कुशारे, यतीन वाघ, श्याम बडोदे, अजित छल्लाणी, राजाभाऊ ठाकरे, अभिजीत बगदे, सुनील दरगोडे, अनंतराव जगताप, प्रेरण देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी गोडसे यांच्याच पाठिशी भक्कमपणे पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला. सुवर्णकार समाजाने पाठिंबा जाहीर केला त्यावेळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, विजय बिरारी, कृष्णा बागूल, कैलास वाघ, बापू ओझरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या मताधिक्क्याने गोडसे पुन्हा निवडूण येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला, ब्राम्हण समाजाच्या मुकुंद कुलकर्णी, विलास कुलकर्णी, श्रीराम चंद्रात्रे, नंदकिशोर ठोंबरे आदींसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ! आषाढी स्पेशल- कवयित्री प्रतिभा खैरनार यांची "भक्तीची वारी !