हिटलरशाहीचा पाडाव करून समीर भुजबळ यांना विजयी करा - अण्णासाहेब कटारे! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

हिटलरशाहीचा पाडाव करून समीर भुजबळ यांना विजयी करा - अण्णासाहेब कटारे

 

नाशिक,दि.२५ एप्रिल :- शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेला, सर्व समावेशक समाजव्यवस्थेचा भक्कम पाया असलेल्या, संविधानाच्या माध्यमातून समर्थपणे उभा राहिलेला आपला देश आहे.  २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर स्वकेंद्रित विचारांच्या गर्तेत अडकलेल्या पक्षांच्या हाती गेला आणि त्यानंतर संपूर्ण देशात घडत गेलेल्या घटना, घडामोडी यांनी देशातील राजकीय, सामाजिक,आर्थिक, नियोजन, न्यायव्यवस्था,व्यक्ती व विचार स्वातंत्र्य अशा सर्वच घटकांवर अंकुश ठेवण्याचे काम केले जात असल्याने हिटलरशाहीचा पाडाव करून समीर भुजबळांना प्रचंड मतांनी निवडून आणा असे आवाहन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले आहे.
            खा.शरदचंद्र पवार यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली प्रांत, राज्य,वर्ण, अन्न इत्यादी विविधता असलेल्या सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जनसहभागातून विकासाची परंपरा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष व भुजबळ कुटुंबिय यांच्या संस्कारातून उभे राहिलेले युवा नेतृत्व समीर भुजबळ हेच खऱ्या अर्थाने नाशिक लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व करणारे सक्षम उमेदवार आहेत.  त्यांच्या मागील कारकिर्दीत करून दाखवलेली विकासाभिमुख कामे पुन्हा नव्या जोमाने सुरु करून नवीन प्रगती पर्वाची सुरवात करण्यासाठी समीर भुजबळ यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!