रूग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गावर तोडगा ! , प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कँन्सर सेंटरमध्ये उपलब्ध, डाँ.राज नगरकर, कँन्सरतज्ञ

प्रगत आयव्ही कंटेनर मानवता कॅन्सर सेंटरमध्ये उपलब्ध
रुग्णालयातील लो हायजीनमुळे होणाऱ्या गंभीर संसार्गांवर तोडगा

नाशिक, २ एप्रिल २०१८::- रुग्णालयात विशेषतः क्रिटीकल युनिट्समध्ये कमी दर्जेच्या वैद्यकीय उपकरणांचा वापर आणि रुग्णालयातील अस्वच्छता यामुळे रोगाशी आधीच झुंजणाऱ्या रुग्णांना विविध संसर्ग होण्याची दाट शक्यता असते ज्याने त्यांच्या आधीच कमकुवत झालेल्या प्रकृतीला अधिक धोका संभवतो. 
रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे आणि लो हायजीनमुळे संसर्ग झाल्याचे आपल्याला काही नवीन नाही. बॅ्क्टेरिया, फंगस ह्याने कित्येक रुग्ण हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनला बळी पडतात. यात रक्तप्रवाहाचा संसर्ग, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय), सर्जिकल साईट इन्फेक्शन (शस्त्रक्रियेतून उद्भवलेले संक्रमण) याचा समावेश आहे. वेळेत निदान न झाल्यास हे प्रकृतीस आणखी गंभीर ठरू शकतात असे मत एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर, नाशिकचे अध्यक्ष आणि सर्जिकल ओन्कोलॉजिस्ट डॉ. राज व्ही. नगरकर यांनी केले. मोठ्या शस्त्रक्रियांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना अशा संसार्गांचा धोका अधिक संभावतो असेही ते म्हणाले.

औषधे, रक्त किंवा ग्लुकोजकरिता आयव्हीचा वापर, आणि कॅथेटर संबंधित संक्रमण इस्पितळांमध्ये सामान्य आहेत. ह्यावर उपाय म्हणून कित्येक मोठ्या वैद्यकीय संस्थांनी नवीन आयव्ही कंटेनरच्या वापरास सुरुवात केली आहे जे अतिशय प्रगत असून  वापरण्यास अगदी सोयीस्कर आहे व त्याने रुग्णास कुठल्याही प्रकारच्या संक्रमणाचा धोका संभवत नाही.
“हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन ही वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठी समस्या असून ही रुग्णांच्या सुरक्षिततेत तडजोड आहे ज्याने रुग्णाला अधिक गंभीर बाबींना सामोरे जावे लागते” अशी हळहळ डॉ. राज व्ही. नगरकर यांनी व्यक्त केली. वैद्यकीय तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले असून सगळ्याच क्षेत्रात प्रगत उपकरणांच्या आणि औषधांच्या मदतीने प्राणदेखील वाचवले जातात. अशावेळी हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनला मात न करता येणे हे लाजिरवाणे आहे आणि त्यामुळेच मानवता कॅन्सर सेंटरने ह्या उच्च दर्जाच्या व अतिशय माफक दरात उपलब्ध असणाऱ्या उपकरणांचा वापर करण्याचे ठरविले आहे असे त्यांनी सांगितले. सगळ्या मेडिकल स्टाफने रुग्णांच्या प्राथमिक स्वच्छतेविषयी अतिशय जागरूक होणे गरजेचे आहे ज्याने आपण हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शनसारख्या समस्यांवर मात करू शकतो असे विधान त्यांनी यावेळी केले.


Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!