श्रीमती शगुफ्ता फारूकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या अल्पसंख्यांक विभाग राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती !! सविस्तर बातमी साठी खालील लिन्कवर क्लिक करा !!!

श्रीमती शगुफ्ता फारूकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या अल्पसंख्यांक विभाग राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती.
औरंगाबाद/नासिक ::- मुळच्या देवळा जि नासिक येथील श्रीमती शगुफ्ता फारूकी यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
         शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी ही नियुक्ती जाहीर केली असुन शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांनी श्रीमती फारूकी यांचे नियुक्तीबाबत अभिनंदन केले.
         सध्या गाढे जळगांव येथे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या फारूकी यांचे बालपण व शिक्षण देवळा येथे झाले आहे, एक उत्तम संचालक म्हणून त्यांनी खुलताबादमधील पतसंस्थेचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळलेला आहे, त्यांची नियुक्ती ही शिक्षक भारती परीवारासाठी अभिमानाची बाब असुन महिलांच्या वाढत्या राजकीय प्रभावाला अधोरेखीत करणारी गोष्ट असल्याचे मत शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्यांकडून व्यक्त होत आहे.
     या नियुक्तीचे मराठवाडा तसेच नासिक जिल्ह्यातील मान्यवर, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !