उद्योजक अनंत सांगळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना प्रवेश ! मातोश्रीवर उध्दव ठाकरेंकडून बांधले शिवबंधन !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नाशिक चे उद्योजक अनंत (नाना) सांगळेंचा शिवसेनेत प्रवेश.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश..
माजी मंञी बबनराव घोलप,आमदार नरेंद्र दराडे  यांनी दिल्या शुभेच्छा...
नाशिक::- येथील उद्योजक  "अधिकारी इंडस्ट्रीज" चे संचालक अनंत सांगळे यांनी  मातोश्री येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार नरेंद्र  दराडे यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला.
       या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन धागा बांधुन सांगळे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सांगळे हे  नाशिकमध्ये विविध  सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
      अनेक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊन त्यांनी बेरोजगारी दूर करण्याचे काम  हाती घेतले आहे. त्यांच्या  या कार्याची दखल शिवसेनेनी घेतली आहे.शिवसेनेच्या माध्यमातून  नाशिकच्या विकासाठी तसेच  सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी  शिवसेनेत प्रवेश केला असून,  पुढील काळात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करत राहणार असल्याचे सांगळे यांनी  सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!