दादर मधील व्यापारी संघटनाचे २५०० हून अधिक व्यापारी व कर्मचारी यांनी दहशतवादी हल्ल्याचा दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला ! मुख्यमंत्री निधीस देणार प्रत्येकी १०००/- रुपये !! सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा !!!दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत 'दादर व्यापर्‍यांनी संघटनेनेमोर्चा काढून जवानांना वाहिली श्रद्धांजलि!

अर्धा दिवस दुकाने बंद ठेऊन दहशतवाद विरोधी घोषणा – फलकांसह २५०० हून अधिक जणांनांचा मोर्चात सहभाग!

 
आपल्या राष्ट्राची सर्वात अनमोल - मौल्यवान संपत्ती असलेल्या आपल्या सैन्यावर पाकिस्तानी अतिरेकी संघटनेने भ्याड हल्ला करून भारत मातेच्या ४४ शूर वीर पुत्रांचं घेतेलेलं बलिदान हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी वेदनादायी व अतिशय दुख्ख: देणारी घटना आहे. या हल्याचा तीव्र निषेध नोंदवत दादर येथील सर्व व्यापारी बांधवांनी आपली सर्व दुकाने (औषधांची दुकाने वगळता)   उतस्फूर्त बंद ठेऊन शत्रू राष्ट्राचा आणि दहशतवादाचा धिक्कार करीत निषेध मोर्चा काढला. या मोर्चामध्ये जवळपास २५०० हून अधिक व्यापारी – कर्मचारी सामील झाले होते. ‘दादर व्यापारी संघ’,  ‘उपनगरीय सराफी संघटना’,  ‘सुवर्णकार कारागीर संघटना’, ‘मराठी व्यवसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ’, ‘ दादर मेटल मर्चंट असोसिएशन’, ‘ दादर हॉटेल संघटना’, ‘ दादर धान्य व्यापारी संघटना’, ‘दादर फेरीवाले संघटना’*  अशानिमित्ताने एकत्र येऊन एकमताने आणि उत्स्फूर्तपणे हा मोर्चा काढला होता.
पुलवामा भ्याड हत्याकांडात शहिद झालेल्या आपल्या भारतीय जवानांना विनम्र - भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच त्याप्रती निषेध नोंदवत सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत सर्व व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेऊन त्यांचा निषेध नोंदवला. त्यासोबतचत दादर मधील सर्व व्यापार्‍यांनी आपल्या दुकांनातील सर्व कर्मचारी सोबत घेत दादर स्टेशन जवळील सुविधा शोरूमला एकत्र जमून शांततेने निषेध मोर्चाला सुरुवात केली. दहशतवादाचा धिक्कार करणारे फलक हातात घेऊन त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ दहशतवाद मुर्दाबादच्या घोषणा देत मोर्चा हळूहळू विजय नगर - फुलमार्केट मार्गे कबुतर खाना व तेथून एस के बोले रोड मार्गे अशोक वृक्ष रोडने जात रानडे रोडला येऊन न. चि. केळकर मार्गे पुढे निघून वीर कोतवाल उद्यानाजवळ येऊन आर के वैद्य मार्गातून पुन्हा रानडे रोडला येऊन शेवटी डी एल वैद्य रोडच्या नाक्यापाशी श्रद्धांजलि सभेनंतर विसर्जित करण्यात आला. यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याने त्यावर कोणताही ताण पडला नाही.
       या सर्व संघटनांनी शाहिद जवानांच्या कुटुंबियांकरिता मदत म्हणून ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री साहाय्यक निधी’साठी कमीत कमी १००० रुपये पासून जास्तीतजास्त भरगोस मदत, दोन दिवसांच्या आत करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने महेश पांडुरंग वैद्य, आनंद जगन्नाथ पेडणेकर, दीपक देवरुखकर, श्रीराम पाध्ये, सुनील शहा, संतोष भडेकर, भैरव शहा, राजेश छेडा यांनी केली.  त्यासाठी "दादर व्यापारी संघ" या नावे धनादेश गोळा करून ते येत्या २२ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केले जाणार आहेत अशी माहीती दिली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!