भारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !! अध्यात्मिक गुढ प्रश्र्नांची उत्तरे देणारा चित्रपटाचे प्रेक्षकांनी केले स्वागत !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

ब्रह्माकुमारीज् निर्मित भारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक मधील विविध चित्रपट गृहातून १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार
नाशिक ::- ब्रह्माकुमारी संस्थेच्या फिल्म डिव्हिजन मार्फत निर्मित  गॉड ऑफ गॉडस् हा चित्रपट भारतात विविध ठिकाणी प्रदर्शीत होत असून आध्यात्मिक गुढ प्रश्नांची उत्तरे देणारा प्रथम आध्यात्मिक चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांनी  या चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. नाशिक मधे या चित्रपटला अभूतपूर्व यश लाभले आहे. एकट्या नाशिक मधून ३१ मार्च रोजी शहरातील सिटी सेंटर मॉलमधील सिनेमॅक्स मधील ४ स्क्रीन मधून कॉलेज रोड येथील बिगबाजारच्या दी जॉन च्या २ स्क्रीन मधून तर नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाज़ा मधील सिनेमैक्सच्या १ स्क्रीन ऐसे मिळून ७  स्क्रीन मधून  १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार आहेत. प्रेक्षकांच  उत्साह पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक व्यंकटेश व् प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मी नारायण या दिवशी लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्तित राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे लॉन्चिंग सिटीसेंटर मॉल, कॉलेज रोड, व् नाशिक रोड येथील चित्रपट गृहत विविध मान्यवरांच्या हस्ते ठेवण्यात आले आहे.
     जागतिक शांती आणि वैश्विक सद्भावनेसाठी कार्य करणा­या ब्रह्माकुमारीज् विश्व विद्यालयाच्या फिल्म् डिव्हिजनद्वारा निर्मित ‘गॉड ऑफ गॉडस् : बर्थ ऑफ अनबॉर्न’ अर्थात् देवांचा देव - अजन्माचा जन्म हा प्रथम आध्यात्मिक चित्रपट भारतातील  विविध पीव्हीआर चित्रपट गृहात प्रदर्शीत  होत आहे. मानवी समाजाची सध्याची वाटचाल, जागतिक स्तरावरील समस्या, त्याची विविध कारणे, त्यात धार्मिक, वैचारिक तेढ, जागतिक शांती नष्ट करणारी कारणे, गुढ परंतु आध्यात्मिक प्रश्नांची निर्मिती त्यास कारणीभूत मुद्दे, मी कोण आहे? परमात्मा कोण आहे? या व इतर प्रमुख आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केला आहे.
चित्रपटाचे निर्माते बी.के. जगमोहन गर्ग आणि बी.के. आयएमस रेड्डि असून बी.के. करूणा हे कार्यकारी निर्माते आहेत. बी.के. व्यंकटेश यांनी सदरहू चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध संगीतकार लक्षमिकांत-प्यारेलाल, व्येशुवा मल्लिक, लक्ष्मी नारायण यांनी संगीतबद्ध केलेले 9 गीत या चित्रपटात आहेत.
यात प्रमुख भुमिका तेजस्विनी मनोगना, ट्राईंग मंत्री, बाबु, राजसिंघ वर्मा, शिवा, जोहन यांच्या आहेत. श्रृती मर्चंट यांनी अप्रतिम कोरेग्राफि केले असून बी.के. अजित यांनी व्ह्युजअल ग्राफिक्सचे कुशल संचलन केले आहे. सिनेमाटोग्राफरसाठी बी.के. करण यांनी मदत केली असून बी.के. सुभाष यांनी डिजिटल रेखांकन, चित्रांकनाची बाजू सांभाळली आहे. रैना डाघेर यांनी अरेबिक गायन तर डुलका रोचा यांनी चित्रपटाच्या परिणामकेसाठी विशेष संशोधन केले आहे.   हा चित्रपट प्रथमच  *3डी साऊंड डिजाईन (DTS* *ATMOS*) ने साकारण्यात आला आहे. यात सतयुगी – देवि -देवतांच्या दुनियातील सांगित आणि नृत्य खूप परिणामकारक साकारण्यात आलेले आहे. अमेरिका आणि चीनच्या फिल्म कंपनींद्वारे परमात्मा, आत्मा व परमधामचे खूप सूंदर व्हिज्युअल इफेक्ट *(VFX)* वापरले आहेत. चित्रपटातील नृत्य हे बॉलीवूड और कॉलिवूड च्या कोरियोग्राफर मार्फत केले आहे.
अत्युच्च दर्जाचे अॅनिमेशन आणि व्ह्युजअल इफेक्टस् आणि नैसर्गीक आणि सहजसुंदर दैवी अभिनयाद्वारे सदरहू चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून जागतिक स्तरावर प्रथमच आध्यात्मिक विषयावर इतक्या दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होत असून  सर्व धर्म-जाती, पंथातील व कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा चित्रपट सोबत पाहिला पाहिजे. या चित्रपटातून नक्कीच अध्यात्मिक उन्नतीचा व जीवन उज्वल बनविण्याचा मार्ग सापडू शकतो असे प्रतिपादन  येथील स्थानिय  मुख्य सेवाकेंद्र प्रमुख राजयोनी ब्रह्मा कुमारी वासंती दिदीजी यांनी केले आहे. मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभलेल्या गॉड ऑफ़ गाॅड्स हा चित्रपट ३१ मार्च रोजी ज्यांना  बघता येणार नहीं त्यांच्या साथी पुन्हा ७ अप्रैल रोजी शहरातील विविध चित्रपट गृहात पुन्हा प्रदर्शित करण्यात येईल

Comments

Popular posts from this blog

भाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर--------!! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

उप अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

७९ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यकपदी पदोन्नतीने पदस्थापना ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!