सेवापूर्ती::- षुरूषोत्तम ठाकूर, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद नासिक चे कार्यकारी अभियंता - हसतमुख व्यक्तिमत्व- बाळासाहेब क्षीरसागर,अध्यक्ष, जिल्हा परिषद, नासिक

नाशिक - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड,कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजय बनकर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ठाकूर यांच्या कामाचे कौतुक करताना जिल्हा परिषदेला दिलेल्या योगदानाबद्दल  समाधानव्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, संजय बनकर यांच्यासह  जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !