जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या अनुभवाची झलक !! प्रभावी, पारदर्शी, लोकाभिमुख कामकाजाला सुरुवात !!

        नाशिक – जिल्हा परिषदेची सुत्र स्विकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व विषयांचा अभ्यास करीत प्रभावीपणे कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच गट विकास अधिका-यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाबाबत विविध सुचना देतानाच आढाव्याची गरज पडणार नाही असे कामकाज करण्याच्या सुचना जिल्हा व तालुकास्तरीय खातेप्रमुखांना दिल्या आहेत. दरम्यान, आज त्यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीना भेटी देवून शाळा, आरोग्य उपकेंद्र, पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी आदि ठिकाणी भेटी देवून कामकाजाची माहिती घेतली. तसेच महिला बचत गटांशी संपर्क साधून मार्गदर्शन केले. तसेच त्रंबकेश्वर पंचायत समितीमध्ये बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला.
            जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यादृष्टीने कामकाजासही सुरंवात केली आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी, उप अभियंता यांची बैठक घेवून विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पदाधिकारी आणि प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्यावर भर देतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी  लीना बनसोड यांनी मार्चअखेर सर्व प्रलंबित कामे तसेच शासनाच्या ध्वजांकित योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत.  
         दरम्यान, आज मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड, बेरवड, हरसुल, ठाणापाडा, अंबोली आदि गावांना भेटी देवून पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र, सार्वजनिक शौचालय बांधकाम आदि कामांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे महिला बचत गटांशी संवाद साधुन त्यांच्या अडी-अडचणी जाणुन घेवून मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे उपस्थित होते. सायंकाळी त्रंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच सर्व खातेप्रमुख व कर्मचा-यांची बैठक घेवून कामकाजाची माहिती घेतली.टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।