घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक ! आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता, जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक ! सध्याचा नासिककर विजय जाधव ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!




घुसमट, पोरखेळ लघुपटांचा दिग्दर्शक !
आयुष्याला पोरखेळ न समजता जीवनाची घुसमट होऊ न देता,
जिद्दीने उभा राहीलेला दिग्दर्शक !
सध्याचा नासिककर विजय जाधव !
न्यूज मसाला सर्विसेस, नासिक

असं म्हणतात की मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे अगदी बालपणापासून लेखन दिग्दर्शन अभिनयाची आवड असलेल्या विजय जाधव यांनी स्वतः ला सिध्द करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी अनेक प्रसंगाला सामोरे जात आत्मविश्वासाने दर्जेदार लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या या कार्याची लघुपट चित्रपट महोत्सवामध्ये दखल घेण्यात आली असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विजय रामप्रसाद जाधव हे मूळचे हिंगोली जिल्हातील काळकोंडी येथील असून सध्या नाशिक मध्ये स्थायिक आहेत. त्याच्या कुटुंबातील आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. पण मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात.
११९१ मध्ये जाधव यांचे वडील गवंडी कामानिमित्त कुटुंबासह नाशिकमध्ये आले. मुलांच्या शिक्षणाची  जबाबदारी आल्याने जाधव यांचे वडील परत गावाकडे आलेत. जाधव यांचे पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण गावी झाले. आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण गावा शेजारील नर्सी नामदेव येथील माध्यमिक शाळेत झाले. 11 वी ते एम. कॉम पर्यंत शिक्षण नाशिकमधील व्हि.एन.नाईक महाविद्यालयात झाले. २००१ साली शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते सहभागी झाले. तेथूनच त्यांना कला क्षेत्राची आवड निर्माण झाली. त्यांना नृत्य शिक्षण शिक्षक संतोष खंदारे यांनी शिकवले. सदर कार्यक्रमात दर्जेदार सादरीकरण केल्याने प्रथम क्रमांक मिळाले, तर उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर ते अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. २००५ मध्ये हिंगोली शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते सहभागी झाले. "डोकं फिरलया"  या गाण्यावर नृत्य सादर केले. या कार्यक्रमात त्यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. त्यातून शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले. २००७ मध्ये पहिल्यांदाच नाटकात सहभाग घेतला शिक्षक अकबर शेख यांनी "नाऱ्याचं लगीन" या नाटकात नाऱ्याची भूमिका सादर करण्याची संधी दिली. या कार्यक्रमात हिंगोलीचे माजी खासदार शिवाजी माने यांच्या हस्ते गौरविले. २०१० पर्यंत अनेक नृत्य नाटकामध्ये सहभाग घेतला. दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर ते नाशिकला पहिल्यांदाच भावाकडे आले. या ठिकाणी ते ९ वर्ष राहिले. २०११ व्ही. एन. नाईक महाविद्यालयात ११ वी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला.
स्वावलंबी शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी शिक्षणा सोबत नोकरी करण्यास सुरुवात केली. सकाळी ७ ते १२ कॉलेज आणि रात्री ९ वाजेपर्यंत नोकरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान नातेवाईक, विलास वाघ आणि अण्णासाहेब वाघ यांच्या राहुल इंटरप्रायाजेस या झेरॉक्स शॉप मध्ये नोकरी करत आहेत. शिक्षण व नोकरी करत असले तरी त्यांना कलेची ओढ कायम होती. २०१३ मध्ये कॉलेज मध्ये एका मराठी चित्रपटाच्या ऑडिशन ची जाहिरात लावल्याची त्यांना दिसली. ऑडिशन मध्ये कधीही सहभाग घेतला नसल्याने ऑडिशन कसे द्यायचे असे अनेक प्रश्न त्यांना पडले. त्यावेळी त्यांना मित्रांनी मदत करत ऑडिशन बाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. मात्र येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेक ऑडिशन दिल्यानंतर निराश न होता वेगळी वाट शोधत त्यांनी स्वतः चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. त्यांचा निर्णय सुरुवातीला मित्रांना अनाकलनीय वाटला पण तो निर्णय त्यांनी सत्यात उतरून दाखविला. चित्रपटासाठी नोकरीतून मिळणारे पैसे जमा करण्यास सुरुवात केली . २०१७ मध्ये मित्रांसोबत "घुसमट" या लघुपटाची निर्मिती केली. घुसमट चे त्यांनी स्वतः दिग्दर्शन करत त्यामध्ये अभिनय केला. या लघुपटास प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यांनी २०१९ मध्ये "पोरखेळ" या लघुपटाचे दिग्दर्शन करत निर्मितीही केली. या मध्ये अर्चना नाटकर, अमोल कदम, सुनिल नागमोती, हरीश शेळके स्वप्नील आडके, धनंजय कहांडळ, अरूण बिडवे, विष्णू कहांडळ आणि योगेश गोसावी, यांनी सहकार्य केले. या लघुपटास मुंबईतील लघुपट महोत्सवात सिने अभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टिप्पण्या

  1. नावाप्रमाणेच विजय मिळवणारा दिग्दर्शक म्हणून विजय जाधव यांची ख्याती आहे.
    वय लहान आहे पण समंजसपणा ओतप्रोत भरला आहे.
    दिग्दर्शका आधी माणूस म्हणून तो प्रत्येकाला न्याय देतो ,त्याचे नेतृत्व फारच परिपक्व आहे.
    त्याच्या सोबत काम करतांना परकेपणा अथवा दडपण वाटत नाही.
    विजू, भावी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।