जिल्हा रुग्णालयात सक्शन युनिटमध्ये बिघाड झाल्याने मोठमोठ्याने आवाज आला होता, तांत्रिक मदनीसांनी तत्काळ समस्या सोडवली आहे - अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नासिक::- जिल्हा रुग्णालय  नाशिक मध्ये आज रात्री साडेनऊच्या सुमारास ३ सक्शन युनिटपैकी एका युनिटमध्ये  बिघाड झाल्याने मोठमोठ्याने आवाज झाला. त्यामुळे ड्यूटीवर असलेला नर्सिंग कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन विभाग, नाशिक महानगरपालिका, नाशिक आणि सरकार वाडा पोलीस स्टेशन यांना तात्काळ कळविले. तांत्रिक मदनीसांनी येऊन तत्काळ समस्या सोडवली आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नसून सर्व रुग्ण व्यवस्थित उपचार घेत आहेत,  प्रशासकीय यंत्रणा सजग असून कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये असा खुलासा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ के आर श्रीवास यांनी केला आहे.
       सदर सक्शन युनिटचा आणि ऑक्सिजनचा काही एक संबंध नसुन ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना कुठल्याही प्रकारची इजा नाही. तसेच सक्शन युनिट आणि ऑक्सिजन हे दोघे वेगळी बाब असल्याने कोणताही गैरसमज करू नये असे ही त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२५,

घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !