यकृत रुग्णांसाठी काही आशेच्या कहाण्या: नाशिककरांचे आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव आपल्या आईला आपल्या यकृताचा भाग देऊ करणारी मुलगी, आज स्वत: आई बनली आहे ! आज अवयवदान दिवसानिमित्त मुंबईतील ग्लोबल हाॅस्पिटल आयोजित नासिकमधील रुग्णांसह भेटीच्या कार्यक्रमाचा खास वृत्तांत !!




यकृत रुग्णांसाठी काही आशेच्या कहाण्या: नाशिककरांचे आयुष्याला कलाटणी देणारे अनुभव

आपल्या आईला आपल्या यकृताचा भाग देऊ करणारी मुलगी, आज स्वत: आई बनली आहे !

     नाशिक (प्रतिनिधी१३)::- अवयवदान दिवस म्हणून साजरा केल्या जाणा-या १३ ऑगस्ट रोजी मुंबईमधील परेल भागातल्या ग्लोबल हॉस्पिटल या मल्टी-स्पेश्यालिटी हेल्थकेअर इन्स्टिट्यूटमध्ये नाशिकमधील यकृत प्रत्यारोपणाच्या रुग्णांसोबत (दाते आणि प्राप्तकर्ते) भेटीगाठीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
इगतपुरी येथे राहणा-या ५० वर्षीय आल्थिया परेरा यांना २०१७ मध्‍ये यकृताची गरज निर्माण झाली; त्याप्रसंगी त्यांची २२ वर्षीय मुलगी लिसा परेरा अवयवदाता म्हणून पुढे आली. एका शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापक आणि विश्वस्त असलेल्या श्रीम. आल्थिया आपल्या आजारातून पूर्णपणे ब-या झाल्या व आपल्या लाडक्या कार्यक्षेत्रात पुन्हा रुजू झाल्या. त्यांना आपले यकृत देऊ करणारी त्यांची मुलगी लिसा हिचे २०२० च्या ऑगस्ट महिन्यात लग्न झाले आणि आज ती एका ८ महिन्यांच्या बाळाची आई आहे. आजारपणामुळे विस्कटू पाहणारी या दोघींच्याही आयुष्याची घडी पुन्हा एकदा बसली आहे व त्यांचे जगणे पूर्ववत झाले आहे. अत्यंत महत्त्वाचा अवयव दान केल्याने किंवा अवयव प्रत्यारोपणानंतर सुरळीत आयुष्य जगणे शक्य आहे याच वास्तवाचे हे अगदी मूर्तीमंत उदाहरण आहे. २०१७ मध्‍ये श्रीम. आल्थिया परेरा कावीळ, असाइटीज अर्थात जलोदर, हेपॅटिक एन्सेफॅलोपथी (यकृताच्या कार्यात बिघाड झाल्याने मज्जासंस्था व मेंदूच्या कार्यावर परिणाम होणे), जीआय ब्लीड (उदरांत्रातील रक्तस्त्राव) व रीनल डिस्फंक्शन (किडनीच्या कार्यात बिघाड) अशा आरोग्य समस्यांची तक्रार घेऊन मुंबईतील परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आल्या. त्यांच्या लक्षणांवरून हे सब-अक्युट प्रकारातील लिव्हर फेल्युअर प्रकरण असल्याचे दिसून येत होते. ही सब-अक्युट प्रकारातील लिव्हर फेल्युअर केस असल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या विविध शाखांतील डॉक्टरांच्या टीमने सल्लामसलत करून त्यांच्यावर लवकर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. यकृत दाता लिसा परेरा सांगतात, "माझ्या आईला तिचे आयुष्य तिच्या इच्छेप्रमाणे जगताना पाहून माझे मन आनंदाने भरून जाते आणि आज अवयवदान दिवशी माझे प्रत्येकाला आवाहन आहे की, शक्य असेल तर एखाद्या व्यक्तीला जीवनदान देण्यासाठी आपण आवर्जून पुढे यावे." 
यकृत प्रत्यारोपणाचे नाशिकमधील आणखी एका उदाहरण व्यवसायाने सीए ३५ वर्षीय पुरुष रुग्ण श्री. सन्मान गोसावी यांचे आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी मुंबईतील परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनाही कावीळ, जलोदर, हेप्टिक इन्सेफॅलोपथी, जीआय ब्लीड आणि रीनल डिस्फंक्शन या समस्या होत्या. निदानाच्या वेळी त्यांचे एमईएलडी (मॉडेल फॉर एंड-स्टेज डिझिज) २९ होते तर सीटीपी १३/सी इतके होते. याचा अर्थ त्यांचे जीवनमान अत्यंत खालावलेले होते, कारण रुग्णाला असाइटीज टॅपिंग, रीनल डिस्फन्क्शन आणि हेप्टिक एन्सेफॅलोपथीसाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत होते. त्यांच्यावरही लवकरच यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येणे आवश्यक असल्याचे निश्चित झाले व त्यांच्या पत्नी श्रीम. बीना देसाई यांनी त्यांना आपले लिव्हर देऊ केले. २ महिन्यांनी पूर्ववत झाल्यानंतर त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली व ते पुन्हा एकदा आपल्या कामावर रुजू झाले. 
मुंबईतील परेल इथल्या ग्लोबल हॉस्पिटल्समधील चीफ लिव्हर ट्रान्स्प्लान्ट सर्जन डॉ. रवी मोहंका म्हणाले, "आपल्या शरीरामध्ये यकृताचे असलेले अत्यंत महत्त्वाचे स्थान आणि त्याची चमत्कारी पुनर्निर्माणक्षमता यांमुळे यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते. दाता तसेच प्राप्तकर्ता, दोघेही अगदी थोड्या काळातच आपले आयुष्य नेहमीसारखे जगू शकतात. आमच्याकडे आलेले रुग्ण शस्त्रक्रियेला पाच वर्षे उलटून गेल्यावरही एक चांगले आयुष्य जगत आहेत व या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो."
संगमनेर येथील ५७ वर्षांचे एक सद्गृहस्थ श्री. भानुदास चौधरी आणि व्यवसायाने शेतकरी असलेले नाशिक येथील ५१ वर्षीय सद्गृहस्थ श्री. दिनकर खोडे यांची उदाहरणेही अशाच प्रकारची आहेत. या दोघांवर अनुक्रमे २०१८ व २०१६ मध्‍ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दोघांनीही सुमारे सात वर्षांपूर्वी श्रीम. आल्थिया परेरा किंवा श्री. सन्मान गोसावी यांच्यासारख्याच तक्रारी घेऊन (कावीळ, जलोदर, यकृताचा आजार आणि लघवीचे प्रमाण कमी होणे) मुंबईतील परेल इथल्या ग्लोबल हॉस्पिटलला भेट दिली होती. त्या सर्वांच्या तब्येतीची तपासणी केल्यानंतर यकृत प्रत्यारोपण हाच त्यांच्यासाठी सर्वाधिक परिणामकारक उपचार ठरेल असा सल्ला त्यांना देण्यात आला. उपरोक्त प्रकरणांपैकी एकाही प्रकरणातील रुग्णाला आयसीयूमध्ये २-३ दिवसांहून अधिक काळ घालवावा लागला नाही, की पूर्ववत होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये १५-१७ दिवसांहून अधिक काळ वास्तव्य करावे लागले नाही. हे सर्वजण जवळ-जवळ सात वर्षांपासून  अतिशय सक्रिय आणि सुरळीत आयुष्य जगत आहेत.
मुंबईच्या परेल येथील ग्लोबल हॉस्पिटल्सचे सीईओ डॉ. विवेक तळावलिकर म्हणाले, "भारत हा अनेक विशेषज्ज्ञ आणि शल्यविशारदांचे आगार म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत सांगायचे झाले तर आम्ही पश्चिम भारतामधील सर्वाधिक यकृत प्रत्यारोपणे पार पाडली आहेत व अतिशय वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणे हाताळली आहेत. स्वतंत्र लिव्हर आयसीई आणि ट्रान्स्प्लान्ट आयसीयू असल्याने आम्ही या प्रांतातील यकृत आणि हेपॅटोलॉजीच्या रुग्णांना अद्ययावत सेवा पुरवू शकतो व येथे होणा-या शस्त्रक्रियांच्या यशस्वीतेचे प्रमाण हे आंतरराष्ट्रीय दर्जानुसार आहे."
-समाप्त-
मुंबई येथील परेल भागात असलेले ग्लोबल हॉस्पिटल हे पश्चिम भारतातील सर्वाधिक नावाजलेले मल्टी-ऑर्गन ट्रान्स्प्लान्ट सेंटर आहे. हे हॉस्पिटल आपल्या हेपॅटोबायलरीच्या क्षेत्रातील चिकित्सात्मक कार्यासाठी तसेच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी, सर्जिकल आणि मेडिकल गॅस्ट्रोएंटेरोलॉजी, किडनी विकार व्यवस्थापन आणि न्यूरो सायन्स अर्थात मज्जातंतूविज्ञानाच्या क्षेत्रातील कार्यासाठीही ही तितकेच प्रसिद्ध आहे. एनएबीएच अधिस्वीकृतीधारक असलेल्या या हॉस्पिटलमध्ये २०० बेड्स आहेत. एक आधुनिक कॅथलॅब, ८ ऑपरेशन थिएटर्स, प्रगत इमेजिंग सेवा (स्लाइस सीटी स्कॅन आणि टेस्ला एमआरआय) या सर्व सुविधांमुळे येथे सरस आपत्कालीन आणि गंभीर आजार व्यवस्थापन सेवा पुरविली जाते, ज्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त प्रोटोकॉलचे पालन केले जाते. हे हॉस्पिटल म्हणजे परिसरात उद्भवणा-या कोणत्याही आपत्कालीन परिस्धितीमध्ये सेवा पुरविणारा एक भक्कम आधारस्तंभ आहे. येथील सेवांच्या सर्वोत्कृष्ट दर्जामुळे सर्व प्रमुख कॅशलेस आरोग्यविमा कंपन्यांनी हॉस्पिटलशी टाय-अप केले आहे व शहरातील सर्व प्रमुख कॉर्पोरेट कंपन्यांकडून या हॉस्पिटलला प्रथम पसंती दिली जाते. या हॉस्पिटलद्वारे भारत, आफ्रिका, मध्यपूर्व आणि सार्क देशांतील रुग्णांना व्हिडिओकन्सल्ट सेवाही पुरविली जाते.
ग्लोबल हॉस्पिटल हे जगातील काही सर्वात मोठ्या आरोग्यसेवा पुरवठादारांपैकी एक असलेल्या आयएचएच हेल्थकेअरचा भाग आहे. एकात्मिक सेवांचा संपूर्ण पट, समर्पित कर्मचारीवर्ग, पोहोच आणि व्याप्ती यांच्या बळावर जगातील सर्वात विश्वासार्ह हेल्थकेअर सर्व्हिस नेटवर्क बनणे ही आयएचएचची आकांक्षा आहे व लोकांच्या आयुष्यांना स्पर्श करणे व आरोग्यसेवेच्या व्याख्येत अमुलाग्र परिवर्तन घडवून आणे हे एकमेव उद्दीष्ट त्यामागे आहे. ग्लोबल हॉस्पिटलबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी http://globalhospitalsmumbai.com
येथे भेट द्या.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।