दाखला देण्याकरिता लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

दाखला देण्याकरिता लाच स्वीकारताना अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

नासिक(धुळे)::- तक्रारदार यांच्या वडिलांच्या नांवे मौजे सोंडले, ता. जि. धुळे येथील शेतजमीन सुलवाडे जामफळ प्रकल्पात संपादित केल्याने तक्रारदार यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळणेकरिता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) धुळे यांचेकडे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकरिता तहसीलदार शिंदखेडा यांच्यामार्फतीने आलोसे छोटू पाटील, मंडळ अधिकारी भाग तामथरे ता.शिंदखेडा यांचेकडे देण्यात आला होता. तक्रारदार यांनी १८ जून रोजी आलोसे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांचा अर्जाच्या चौकशीचा अहवाल तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २०००/-रु.लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची १९ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती २०००/-रु लाचेची मागणी करून आज दि. २०जून रोजी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून २०००/-रु लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले असून सोनगीर पो. स्टे. येथे भ.प्र.अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२५,

घरकुलाचा हप्ता मिळण्यासाठी स्विकारली लाच !ग्रामसेवकासह रोजगार सेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जास्त भावाने बियाणे विक्री केल्यास प्रशासनाची विक्रेत्यांवर कारवाईची तयारी !