पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

इमेज
त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती नाशिक  : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच दररोज त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसर व शहरात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम गुरुवार, दि. १६ एप्रिलपासून सुरू झाली असून दि.२० एप्रिल रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.            देवस्थान परिसरात आणि प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या अतिक्रमित बांधकामे, टपऱ्या व अनधिकृत दुकाने यामुळे रस्ते अरुंद झाले होते. परिणामी भाविकांना पायी चालताना अडथळे निर्माण होत असून गर्दी वाढत होती. विशेषतः सण-उत्सव आणि गर्दीच्या कालावधीत या समस्येची तीव्रता अधिक जाणवत होती.              ही परिस्थिती लक्षात घेऊन त्रिंबक नगरपरिषद प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे रस्ते मोकळे होऊन भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ हालचालीस मदत ...