पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

इमेज
दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६, नासिक::- साप्ताहिक न्यूज मसाला च्या "लोकराजा" (वर्ष १५ वे) दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. 📍📍साहित्य ३० जुन २०२६ पर्यंत पाठविण्यात यावे !📍📍 संपादक, न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी अंक  ३०३, राॅयल होम्स, कॅनडा काॅर्नर, शरणपूर, नासिक, ४२२००२ किंवा Email- newsmasala1@gmail.com अधिक माहितीसाठी मो. 7387333801 वर संपर्क करावा.              राष्ट्रीय विक्रम प्राप्त एकमेव दिवाळी विशेषांक तथा आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, ११ वर्षे मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करणारा एकमेव दिवाळी विशेषांक ठरला आहे व २०२३ ला प्रभू श्रीराम मंदीराचे मुखपृष्ठ, २०२४ ला श्री विठ्ठल मंदिर, २०२५ ला श्री साईबाबा मंदिराचे मुखपृष्ठ प्रकाशित करुन आणखी एका नवीन विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

इमेज
३१ मे २०२६ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विशेष लेख महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्राच्या इतिहासाला अनेक थोर संत, समाजसुधारक आणि आदर्श राज्यकर्त्यांचा गौरवशाली वारसा लाभला आहे. त्या तेजस्वी परंपरेतील एक अद्वितीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लोककल्याण, न्यायप्रियता, धर्मपरायणता आणि सक्षम प्रशासन यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. म्हणूनच इतिहासाने त्यांना ‘लोकमाता’ आणि ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी बहाल केली.  अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील चौंडी या गावात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा फारशी नव्हती; परंतु माणकोजी शिंदे यांनी अहिल्यादेवींना धार्मिक, नैतिक आणि व्यवहारज्ञानाचे शिक्षण दिले. बालपणापासूनच त्यांच्यामध्ये करुणा, परोपकार आणि नेतृत्वगुण दिसून येत होते. असे सांगितले जाते की, मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांनी एका मंदिरात लहान अहिल्यादेवींना भक्तिभावाने पूजा करता...

विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग,,,,,,,,,, भाग २- लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक

इमेज
विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग भाग २-   लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक आजचा काळ वेगवान आहे, तणावपूर्ण आहे आणि बदलत्या सामाजिक वास्तवांनी भरलेला आहे. शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन, सोशल मीडिया, बदललेली जीवनशैली आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्या प्रभावामुळे विवाहसंस्थेचे स्वरूपही बदलत आहे. अशा परिस्थितीत विवाह ही केवळ दोन व्यक्तींची सामाजिक घटना राहिलेली नाही; तर ती भावनिक, मानसिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक समन्वयाची अत्यंत संवेदनशील प्रक्रिया बनली आहे. यामुळेच आजच्या काळात प्री मॅरेज (विवाहपूर्व) आणि पोस्ट मॅरेज (विवाहोत्तर) कौन्सिलिंग ही केवळ पर्यायी गोष्ट नसून, एक अत्यावश्यक सामाजिक गरज बनली आहे. *विवाहपूर्व समुपदेशन : योग्य सुरुवातीची शाश्वती* विवाह ठरण्यापूर्वी मुलगा-मुलगी यांचे शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती किंवा बाह्य व्यक्तिमत्त्व पाहिले जाते; परंतु अनेकदा पुढील अत्यंत महत्त्वाचे विषय दुर्लक्षित राहतात — ◆ भावनिक परिपक्वता ◆ संवादशैली ◆ राग व मतभेद हाताळण्याची पद्धत ◆ कुटुंबाबद्दलची भूमिका ◆ आर्थिक सवयी ◆ वै...

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

इमेज
विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे.. डॉ. दिलीप कोठावदे यांनी लिहिलेला भारतीय संस्कृतीत विवाह सोहळा याविषयी परखडपणे मांडलेले विचार आज समाजासाठी खूप महत्त्वाचे आहेत, यांत मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय भरला जातोय याची जाणीव आता नवविवाहित वधू-वरांनी तसेच त्यांच्या आई-वडिलांनी ठेवणे काळाची गरज आहे. भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ सामाजिक कार्यक्रम नाही; तो एक संस्कार आहे. दोन व्यक्ती, दोन कुटुंबे, दोन परंपरा आणि दोन आयुष्ये एकमेकांशी जोडण्याचा तो पवित्र क्षण मानला गेला आहे. पूर्वी लग्न म्हणजे घराघरांतला आनंद, नात्यांतील ऊब, आपुलकीचा सहवास आणि साधेपणातला समाधानाचा सोहळा असायचा. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. विवाह हा संस्कार कमी आणि दिखाऊपणा, प्रतिष्ठा, पैसा, स्पर्धा आणि सामाजिक बाजारपेठ यांचे प्रदर्शन अधिक बनला आहे.          आजचा विवाहसोहळा पाहिला की प्रश्न पडतो — लोक लग्न करत आहेत की एखादा चित्रपट शूट करत आहेत ? हजारो लोकांची गर्दी, लाखो रुपयांची सजावट, डीजेचा कर्णकर्कश आवाज, सोशल मीडियासाठी बनवलेले कृत्रिम हावभाव,...

लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल

इमेज
लोकअदालतीत ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली, ६४ कोटी रूपयांचे तडजोड शुल्क वसूल नाशिक ::- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत  जिल्ह्यातून एकूण ३ हजार ७६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे ६४ कोटी ९ लाख ४१ हजार ८४७ रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सतीश हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. लोकअदालमध्ये तडजोड करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालय व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात एकूण ४९ पॅनेलची व्यवस्था करण्यात आली  होती. सर्व पॅनेल प्रमुख, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. रोकडे यांच्या मार्गदर्शखाली कामकाज केले. दावा दाखपूर्व प्रकरणांमध्ये एकूण ३९ हजार ५९८  प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २ हज...