दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !
साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

नासिक::- साप्ताहिक न्यूज मसाला च्या "लोकराजा" (वर्ष १५ वे) दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक नरेंद्र पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.

📍📍साहित्य ३० जुन २०२६ पर्यंत पाठविण्यात यावे !📍📍

           राष्ट्रीय विक्रम प्राप्त एकमेव दिवाळी विशेषांक तथा आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना स्पर्धेत निवड व गौरव पुरस्कार तसेच काव्यमंच पुरस्कारासह अनेक मान्यवरांनी गौरविलेल्या, ११ वर्षे मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्याचे छायाचित्र प्रकाशित करणारा एकमेव दिवाळी विशेषांक ठरला आहे व २०२३ ला प्रभू श्रीराम मंदीराचे मुखपृष्ठ, २०२४ ला श्री विठ्ठल मंदिर, २०२५ ला श्री साईबाबा मंदिराचे मुखपृष्ठ प्रकाशित करुन आणखी एका नवीन विक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यात आली आहे.
           न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी अंक यंदा १५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी साहित्यिक विचारांचा गौरव व नव साहित्यिकांच्या लेखनाला यथोचित सन्मानाने स्थान देण्याचा मानस या वैशिष्ट्यांसह "लोकराजा" अंकाने सर्वदुर सहस्रावधी वाचकांची आवड जोपासली आहे. लेखक, कवी, विचारवंतानी आपण स्वत: लिहिलेली साहित्य कृती (कथा, कविता, ललित लेख यापैकी फक्त एकच साहित्य रचना) खालील पत्यावर पोष्टाने किंवा ई-मेल वर ३०जुन  २०२६ पर्यंत पाठवावे. कथा, कविता, लेख यांना विषयाचे बंधन नसले तरीही *प्रशासकीय सेवेत समाजकार्य करणाऱ्या "दैवतुल्य" व्यक्तिमत्वांचे आपल्याला आलेले कार्यानुभव* या विषयाला प्राधान्याने स्थान देण्यात येऊ शकते. इतर साहित अश्लिलता विरहीत असावे. आपली भारतीय संस्कृति, चाली रिती जोपासणारे साहित्य अपेक्षित आहे . शब्दमर्यादा-- कथा १५००/३००० शब्द , लेख १००० शब्द, कविता १०० शब्द आहे, (विषयाच्या अनुषंगाने कमी जास्त, दिर्घ कथा यथोचित मर्यादा) आपली कोणतीही एक उत्कृष्ट साहित्य रचनादि. ३० जुन २०२६ पर्पयंत खालील पत्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे, 
पत्ता - 
संपादक, न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी अंक 
३०३, राॅयल होम्स, कॅनडा काॅर्नर, शरणपूर, नासिक, ४२२००२
किंवा
Email- newsmasala1@gmail.com
अधिक माहितीसाठी मो. 7387333801 वर संपर्क करावा. धन्यवाद ।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन : सुदृढ भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे नेणारा काळ सुसंगत मार्ग,,,,,,,,,, भाग २- लेखक :- डॉ.दिलीप के.कोठावदे, नाशिक

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

महाराष्ट्राची लोकमाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर