आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा सर्वात मोठा विजय ! लेडी गागा-रिहाना यांच्या गाण्यांवर मात करत 'नाटू-नाटू''ने जिंकला ऑस्कर !
आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा सर्वात मोठा विजय ! लेडी गागा-रिहाना यांच्या गाण्यांवर मात करत 'नाटू-नाटू''ने जिंकला ऑस्कर ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ऑस्कर २०२३ च्या विजेत्यांचा सन्मान आज भारतीय वेळेनुसार पहाटे करण्यात आला. हॉलिवूडच्या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारताने आपले नाव झळकावले आहे. दक्षिणेच्या आरआरआर चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याने इतिहास रचताना हा मान पटकावला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना एमएम कीरावानी यांनी आपल्या मनोगताने सर्वांची मने जिंकली आहेत. इतकेच नाही तर नातू-नातूने या विजयासह प्रसिद्ध गायिका रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांनाही मागे टाकले आहे. नाटू-नाटूने कोणती गाणी मागे टाकून हे यश मिळवले आहे, जाणून घेऊया:- ऑस्कर २०२३ मध्ये नाटू-नाटूने 'सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे' शीर्षक पटकावले आहे. टेल इट लाइक अ वुमन अॅप्लॉज, टॉप गन: मॅव्हरिक्स होल्ड माय हँड, ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर लिफ्ट माय अप, आणि एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स दिस इज अ लाइफ या गाण...