Posts

आज नाम. बाळासाहेब थोरात नासिक दौ-यावर ! माजी मंत्री कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट !! दौऱ्याच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
आज शुक्रवार दि.६ डिसेंबर रोजी सकाळी वाजता प्रदेशाध्यक्ष, नामदार बाळासाहेब थोरात नाशिक दौ-यावर !     नासिक::-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे आज शुक्रवार दि.६ डिंसेबर रोजी सकाळी ९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे हेलिकॅाप्टर व्दारे आगमन होत आहे. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे- स.९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड, नाशिक येथे आगमन स.९.५० वाजता गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह,  स.१०.३० वाजता कै. तुकाराम दिघोळे यांच्या निवासस्थानी सांत्वनभेट व नंतर सकाळी ११.०० वाजता पोलिस परेड ग्राउंड येथुन हेलिकॅप्टरने धुळे जिल्ह्याकडे प्रयान.

लाच स्विकारताना दोघांना अटक ! कुणी, कशासाठी मागीतली लाच ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
आलोसे नानासाहेब रामकिशन नागदरे,पोलीस निरीक्षक, व  सुभाष हरी देवरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, दोन्ही नेमणुक नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांना २२,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक करण्यात आली.
              तक्रारदार यांचे ७ डिसेंबर २०१९ रोजी सुला वाईन, नाशिक म्युजिक इवेंट असून त्यासाठी
त्यांना साउंड सिस्टीमची परवानगी देणेकामी तक्रारदार यांचेकडे दि.४/१२/२०११ रोजी आलोसे  नानासाहेब रामकिशन नागदरे, पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २२,०००/- रुपये लाचेची मागणी केली व त्यानंतर दि ५/१२/२०१९ रोजी आलोसे सुभाष हरी देवरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक,
नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी याच कामासाठी तक्रारदार यांचेकडे ९.०००/-रूपये
लाचेची मागणी केल्याने, ला.प्र वि नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता पंचसाक्षीदार यांचे समक्ष आलोसे नानासाहेब  नागदरे, यांनी २२,०००/-रुपये लाचेची रक्कम आज दि.५/१२/२०१५ रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कक्षात स्विकारली असता नानासाहेब नागदरे, व सुभाष द…

बॅंकेच्या कर्ज मर्यादेत ८ लाखावरून १० लाख करण्याचा संचालक मंडळाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय !!! नुतन अध्यक्ष सुनील बच्छाव व उपाध्यक्ष अजित आव्हाड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

Image
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या
कर्ज मर्यादेत वाढ - सुनिल बच्छाव, अध्यक्ष       नासिक::- नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या नियमित कर्जाची मर्यादा दि.०१ डिसेंबर २०१९ पासुन ८ लाखावरून १० लाख इतकी करण्याचा महत्वपुर्ण कर्मचाऱ्यांना दिलासा देणार निर्णय घेण्यात आला.
          नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्याच सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे नुतन अध्यक्ष सुनिल बच्छाव यांनी सांगितले आहे तसेच सभासद झाल्याबरोबर १ वर्षापर्यंत देत असलेला कर्ज मर्यादेत देखील वाढ करून ३ ऐवजी ५ लाख इतकी तर २ वर्ष पुर्ण झालेल्यांना ४ ऐवजी ७ लाख इतकी मर्यादा केली असल्याची माहीती नुतन उपाध्यक्ष अजित आव्हाड यांनी दिली.
        संचालक मंडळाची नुकतीच पहिली बैठक अध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सातव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ झाली असुन त्यांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी कर्ज मर्यादेत वाढ करण्यात यावी, याबाबत चर्चा करण्यात आली. त्यास सर्व संचालकांनी एकमताने मंजुरी दिली असुन, सदरची
वाढ दि. ०१ डिसेंबर २०१९ पासून लागू होणार आहे, सर…

वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय! इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून- माई घाट : क्राइम नं.103/2005. कुणी पटकावला सर्वोत्कृष्ट पुरस्कार ? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

Image
वास्तवात घडलेल्या घटनेला पडद्यावरही न्याय!

'इफ्फी'मध्ये ७६ देशांमधील २०० सिनेमांमधून 'माई घाट : क्राइम नं.103/2005' च्या उषा जाधवने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!



मराठी सिनेमांनी नेहमीच गरुडझेप घेत देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री उषा जाधवची मुख्य भूमिका असलेला 'माई घाट :क्राइम नं.103/2005' हा मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून भारतासोबतच परदेशांमधीलही आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकाची थाप मिळवत आहे. नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडीया (इफ्फी)मध्येही या चित्रपटाने आपलं अस्तित्व कायम राखले आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या 'माई घाट : क्राइम नं.103/2005'या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जगभरातील ७६ देशांमधील एकूण २०० सिनेमांमधून निवडलेल्या १५ उत्कृष्ट सिनेमांमध्ये दर्जेदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींमधून उषाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाल्याने हा पुरस्कार सर्वार्थाने या चित्रपटा…

२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !!मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक नियुक्त्यांचा ! कागदपत्रांची पडताळणी, समुपदेशन, अन् हातात नियुक्ती पत्र !! इतिहासात पहिल्यांदाच असे घडले !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व जाणून घ्या , कुठे घडले !!!!

Image
२०१४ नंतर सापडला आजचा मुहूर्त !!
मात्र मुहूर्त ठरला ऐतिहासिक !! नासिक::- जिल्हा परिषदेत आज अनुकंपा प्रतिक्षा यादीतील ६२ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. सन २०१४ पासुन कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली नव्हती मात्र आज अनुकंपा तत्त्वावर ६२ उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
       शासननिर्णयानुसार सेवाज्येष्ठता व शैक्षणिक अर्हता यांची सांगड घालत नियुक्ती पत्र देण्यात आली. आजच्या नियुक्त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद करावी अशा ठरल्या. कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करून समुपदेशनाद्वारे रिक्त जागांपैकी उमेदवाराने निवड केलेल्या ठिकाणी तत्काळ नियुक्ती चे पत्र देण्यात आले.
         या ऐतिहासिक नेमणुका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या मार्गदर्शनाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) रविंद्र परदेशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, गांगुर्डे, राजेंद्र देसले, महेंद्र पवार, रणजित पगारे, आदींच्या उपस्थितीत देण्यात आल्या. ******************************************
कामा…

इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर आवारी यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

Image
इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकरिनीची निवड बिनविरोध इगतपुरी ::-तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक आज वाडिवऱ्हे येथे माजी अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात सन २०२०-२०२२ या  वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, अध्यक्षपदी प्रभाकर आवारी, उपाध्यक्ष पदी किसन काजळे, मंगेश शिंदे, कार्याध्यक्ष रामभाऊ नाठे, खजिनदार जाकिर शेख, सरचिटणीस विजय पगारे, संघटक शंकर मते, सहसरचिटनीस ज्ञानेश्वर गुळवे, राम शिंदे, सहखजिनदार भावराव रोंगटे, सह संघटक गौरव परदेशी, अशा प्रकारे सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
        नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे, न्यूज मसालाचे संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद मालुंजकर यांनी काम पाहिले.
यावेळी व्यासपीठावर ज…

नाशिक तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर गोडसे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

Image
नाशिक तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर गोडसे यांची बिनविरोध निवड ! नाशिक::-जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाची२०२०-२२ द्वैवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली.  यात सुधाकर गोडसे यांची लागोपाठ चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली.
परिषदेच्या नियमावलीनुसार काल निवडणूक निर्णय अधिकारी मोतीराम पिंगळे यांचे उपस्थितीत नाशिक येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी तालुका अध्यक्षपदी सुधाकर गोडसे, उपाध्यक्ष दिनेशपंत ठोंबरे, अरुण तुपे, कार्याध्यक्ष सुनील पवार, सरचिटणीस अरुण बिडवे, खजिनदार हरिश बोराडे, संघटक प्रकाश उखाडे व दीपक कणसे, सहचिटणीस गोकुळ लोखंडे, संतोष भावसार, सहखजिनदार नंदू शेळके यांची निवड झाली. याप्रसंगी मंगलसिंग राणे, पंकज पाटील, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, संजय निकम, वसंत कहांडळ, संजय कवडे, पुरुषोत्तम वानखेडे, रमेश लोखंडे, विलास साळवे, प्रविण आडके आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा पिंगळे यांचे हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकार्‍यांचे परिषद उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष आण्णा बुरगुडे, कल्याणर…