सेंट्रल गोदावरी क्रुषक सेवा सहकारी संस्थेवर कायदेशीर कारवाई करणार--बाळासाहेब लांबे

पत्रकार परिषद
दि. 02/04/2018

नासिक::-सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या संचालक पदावरून माझी हकालपट्टी झाल्याबाबत मला कुठलीही कायदेशीर वा खासगीत कल्पना न देता परस्पर एका वृत्तपञाला बातमी आणण्यामागे केवळ बदनामी करण्याचा हेतू असल्याचा आरोप बाळासाहेब लांबे यांनी पञकार परिषदेत केला.
या संदर्भात आपली भुमिका विषद करतांना बाळासाहेब यांनी सांगीतले की,११ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या संस्थेच्या मासिक बैठकीत मला तज्ञ संचालक म्हणून नियूक्त करण्यात आले.त्यानंतर जानेवारी,फेब्रूवारी २०१८ या काळात झालेल्या बैठकांमध्ये मी सहभाग नोंदविला आहे.दि.२८ मार्च २०१८ रोजी झालेल्या बैठकीला बाहेरगावी असल्याने हजर राहू शकलो नाही.बाहेरगावाहून काल परवा नाशिकला आल्यानंतर एका वृत्तपञातील बातमी वाचल्यानंतर सेंट्रल गोदावरी संस्थेच्या संचालक पदावरून माझी हकालपट्टी झाल्याची बातमी समजली.आश्चर्याचा धक्का बसला. फक्त तीन साडेतीन महिन्यांत असे काय घडले की तत्काळ माझी हकालपट्टी व्हावी ?
बातमीत एका संचालकाने मी संस्थेची बदनामी करीत असल्याचा धादांत खोटा आरोप लावला आहे.कुठल्याही सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकाची नियुक्ती करतांना किंवा बडतर्फ करतांना संबधित संचालकाला पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे.संस्थेच्या घटनेप्रमाणे नोटीस बजावणे आवश्यक असते.प्रोसिडींग करावे लागते. त्या प्रोसिडींगची प्रत व ठरावाची प्रत संबधितांना पाठवायला हवी असते, आज ही मला तसे कोणतेही पत्र मला मिळालेले नाही, याचा अर्थ मी आजही संस्थेचा तज्ञ संचालक आहे असे सिद्ध होते, मग माझ्या अनुपस्थितीत हकालपट्टीचे षडयंञ करून केवळ एका वृत्तपञाला सदर माहीती देऊन बातमी छापून आणण्यात काही हितसंबंधी संचालकांनी माझी बदनामी करण्याचा हेतू साध्य केल्याचा आरोप बाळासाहेब लांबे यांनी त्या वृत्ताचे खंडन करतांना केला.
या हकालपट्टीचे समर्थन करतांना संस्थेच्या एका संचालकाने बाळासाहेब लांबे संस्थेची  बदनामी करीत असल्याचा ठपका ठेवला,यावर स्पष्टीकरण देतांना बाळासाहेब लांबे यांनी सांगीतले की,संस्थेची बदनामी केली म्हणजे नेमके काय केले,याचा खुलासा करण्याचे धाडस त्यांनी दाखवावे असे आव्हान दिले.
संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रीयेत कमीशन लाटणाऱ्या प्रवृत्तींना चव्हाट्यावर आणणे ही बदनामी असेल तर ती मी केली आणि हजारवेळा करील.काही संचालकांच्या दलालखोरीला विरोध केल्यामुळे माझी हकालपट्टी आणि हकालपट्टीचे वृत्त छापून आणण्याचे षडयंञ राबविले गेल्याचा आरोप लांबे यांनी केला.या संदर्भात मी माझ्या वकीलांशी विचारविनिमय करीत असून लवकरच माझ्या बदनामीचे व समाजातून तसेच राजकीय कारकिर्दीतून उठवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या प्रव्रुत्तींविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बाळासाहेब लांबे यांनी शेवटी सांगीतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।