लाच स्विकारताना दोघांना अटक ! कुणी, कशासाठी मागीतली लाच ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


आलोसे नानासाहेब रामकिशन नागदरे,पोलीस निरीक्षक, व  सुभाष हरी देवरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, दोन्ही नेमणुक नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांना २२,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना अटक करण्यात आली.
              तक्रारदार यांचे ७ डिसेंबर २०१९ रोजी सुला वाईन, नाशिक म्युजिक इवेंट असून त्यासाठी
त्यांना साउंड सिस्टीमची परवानगी देणेकामी तक्रारदार यांचेकडे दि.४/१२/२०११ रोजी आलोसे  नानासाहेब रामकिशन नागदरे, पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी २५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २२,०००/- रुपये लाचेची मागणी केली व त्यानंतर दि ५/१२/२०१९ रोजी आलोसे सुभाष हरी देवरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक,
नाशिक तालुका पोलीस स्टेशन, जि.नाशिक यांनी याच कामासाठी तक्रारदार यांचेकडे ९.०००/-रूपये
लाचेची मागणी केल्याने, ला.प्र वि नाशिक पथकाने सापळापुर्व पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता पंचसाक्षीदार यांचे समक्ष आलोसे नानासाहेब  नागदरे, यांनी २२,०००/-रुपये लाचेची रक्कम आज दि.५/१२/२०१५ रोजी नाशिक तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कक्षात स्विकारली असता नानासाहेब नागदरे, व सुभाष देवरे, यांना पकडण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।