जमैकाच्या सौंदर्य स्पर्धेतील मानाचा "मिसेस युनायटेड नेशन" किताबाची मानकरी ठरली नासिक कन्या श्रद्धा कक्कड ! बाँलीवुड मध्ये पदार्पण करण्याचा श्रद्धाचा मानस !! सविस्तरतेसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट्राच्या श्रद्धा कक्कड जमैकाच्या सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनायटेड नेशन किताबाने सन्मानित...
आज महिलांनी सर्वच क्षेञात दबदबा निर्माण केला आहे, त्यातच अशी महिला (नासिक कन्या) श्रद्धा कक्कड जिने आजपावेतो देश विदेशातील अनेक सौंदर्य स्पर्धेचे पारितोषिक जिंकले आहे. त्यावर कळस करत तिने आज जमैकातील सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनायटेड नेशन हा किताब मिळवून नासिकसह देशाचे नांव उज्वल केले.
नासिकच्या बी. वाय. के काॕलेज व पुणे विश्वविद्यालयातून शिक्षण  घेत असताना लहानपणापासूनच सौंदर्य स्पर्धेत करियर बनण्याचे स्वप्न तिने पाहिले होते..

वडिलांना व्यवसायात नुकसान आल्यानंतर तिने शिक्षण करित असताना वेगवेगळ्या मोबाईल कंपन्याचे सिम कार्डही विकले , तसेच  पुण्यात एका खाजगी बँकेतही नोकरी केली..

जीवन संघर्षमय होते अनेक अडचणीवर मात करीत श्रद्धा ने 2000 साली मिस नाशिक हा अवार्ड जिंकला . त्यानंतर 2 वर्षात मिस पुणे हा अवार्ड नावावर केला..
तिचा सौदंर्य स्पर्धेचा प्रवास अखंडपणे चालू होता. त्यात मानाची भर पडली ती 2017 मध्ये दिल्लीत मिस इंडिया होममेकर हे अवार्ड जिंकल्याने.
त्यानंतर जमैका मध्ये होणाऱ्या मिसेस युनायटेड नेशन या स्पर्धेसाठी एशिया तर्फे प्रतिनिधित्व करित  जमैकात अँवार्ड आपल्या नावावर करित तिरंगा जमैकात फडकविला.

श्रद्धा समाजसेवाही करीत आहे. पुण्यातील अनाथ मुलांसाठी ती संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे.
विश्व पर्यावरण संरक्षण व हरित क्रांती साठी ही तिचे योगदान आहे.
बाॕलीवुड मध्येही भविष्यात काम करण्याची इच्छा तिने आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखविली..

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!