इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रभाकर आवारी यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकरिनीची निवड बिनविरोध
इगतपुरी ::-तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक आज वाडिवऱ्हे येथे माजी अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात सन २०२०-२०२२ या  वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, अध्यक्षपदी प्रभाकर आवारी, उपाध्यक्ष पदी किसन काजळे, मंगेश शिंदे, कार्याध्यक्ष रामभाऊ नाठे, खजिनदार जाकिर शेख, सरचिटणीस विजय पगारे, संघटक शंकर मते, सहसरचिटनीस ज्ञानेश्वर गुळवे, राम शिंदे, सहखजिनदार भावराव रोंगटे, सह संघटक गौरव परदेशी, अशा प्रकारे सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
        नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे, न्यूज मसालाचे संपादक तथा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद मालुंजकर यांनी काम पाहिले.
यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार के. टी. राजोळे, मावळते अध्यक्ष विक्रम पासलकर, अशोक शिंदे, राजेन्द्र गायकवाड़, विजय बारगजे, विलास खापरे, डी डी धोंगड़े, विलास खापरे, राजू गाढवे, उत्तम गायकर, शरद धोंगड़े  हे पत्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)