दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष कथार !सरचिटणीसपदी भगवान गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी महेश ठुबे यांची बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष कथार !
सरचिटणीसपदी भगवान गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी महेश ठुबे यांची बिनविरोध निवड !
दिंडोरी::-नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अद्यक्ष अण्णा बोरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली , नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा निवडणूक अधिकारी कल्याणराव आवटे, निरीक्षक किशोर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बिनविरोध संपन्न झाली.
यात अध्यक्ष पदी तिसऱ्यांदा संतोष कथार ,सरचिटणीस भगवान गायकवाड, कार्याध्यक्ष महेश ठुबे, उपाध्यक्ष संदीप मोगल, सुखदेव खुर्दळ, खजिनदार अशोक केंग, चिटणीस संजय थेटे, संघटक रमाकांत शार्दूल, सहचिटणीस गोरख जोपळे, सहखजिनदार केशव चित्ते, सहसंघटक रविंद्र तुंगार यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणराव आवटे, निवणूक निरीक्षक किशोर जाधव यांनी दिली.
यावेळी, नितीन गांगुर्डे, रामदास कदम,बाळासाहेब अस्वले, अशोक निकम, विलास ढाकणे, बाळासाहेब अस्वले, सुनिल घुमरे,बापू चव्हाण, नारायण राजगुरू, शांताराम पगार, राजेंद्र जाधव,विलास जमदाडे, खंडेराव डोखले, खंडेराव बोराडे, पवन देशमुख, अरुण बैरागी, निलेश मौले, किशोर बोरा, संतोष चारोस्कर, दशरथ पगारे, सचिन बसते, विनोद गायकवाड, हेमंत पवार, आदी सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या सर्व 11 पदासाठी एक एक अर्ज आल्याने सर्व पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचीघोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणराव आवटे यांनी केली.यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा निवडणूक निर्णय अधिकारी ,निरीक्षक ,व जेष्ठ पत्रकार यांच्या हस्ते गुच्छ व निवडीचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पत्रकार संघाचे कामकाज उत्कृष्ट असल्याने व विविध उपक्रम राबविल्याने सभासदांनी पुन्हा एकदा जुन्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निवडणूक बिनविरोध केली आहे.अशी प्रतिक्रिया अध्यक्ष संतोष कथार व पदाधिकारी यांनी दिली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!