तहसीलदार उपस्थित नव्हते तर प्रांत यांची असहकाराची भूमिका ! अखेर खासदार व पदाधिकाऱ्यांनी निवेदन चिकटविले शासनाच्या वाहनाला !! कुठे घडला असा प्रकार, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी, निफाड यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस,
खासदार भारती पवारांच्या आंदोलनाला निफाड प्रशासनाचे असहकार्य
                नासिक::- आज निफाड येथे भारतीय जनता पार्टी निफाड तालुका तर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्नानंबाबत तहसील कार्यालय येथे दिंडोरी लोकसभा खासदार भारती पवार तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, निफाड तालुका अध्यक्ष भागवतबाबा बोरस्ते, लासलगाव मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डी. के. नाना जगताप, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यासाठी गेले असताना मे. तहसीलदार उपस्थित नसल्याने भारती पवार यांनी प्रांत अर्चना पठारे यांना विनंती केली, आम्ही ५ लोक सोशल डिस्टन्स पाळून तुम्हाला निवेदन देणार आहोत, तुम्ही या, असे सांगितले, परंतु त्या त्यांच्या केबिन सोडून निवेदन घेण्यास न आल्याने शेवटी शासनाने दिलेल्या त्यांच्या वाहनास निवेदन चिकटवून निषेध करण्यात आला. एका लोकप्रतिनिधी खासदार यांना अशी वागणूक तर सामान्य जनतेचे सामान्य शेतकऱ्याचे काय ?  हा प्रश्न सर्वसामान्य जनतेस विचार करण्यासारखा आहे. यावेळी मीडिया प्रवक्ता तथा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, ओबीसी नेते कैलास  सोनवणे, राजाभाऊ शेलार, शंकरराव वाघ, वैकुंठ भाऊ पाटील, बापू  पाटील, संजय गाजरे, संजय वाबळे, सतीश मोरे, लक्ष्मण निकम, आदेश सानप, जगन कुटे, सुरेखा कुशारे, उन्मेश काळे, सारिका डेर्ले, स्मिता कुलकर्णी, रूपा केदारे, सिंधू पल्हाळ, सोशल मीडियाचे योगेश चौधरी, प्रशांत गोसावी, तसेच दीपक श्रीखंडे, श्रीराम आढाव, नितीन जाधव हे उपस्थित होते.
प्रतिक्रिया
सुवर्णा जगताप =सभापती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
          भाजपा पक्षाच्या वतीने व खासदार डॉ. भारती पवारांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी कर्ज माफी योजनेचा फायदा  होत‌ नसल्याने सदर निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी उपस्थित होतो परंतु प्रशासनाच्या असहकार्य मुळे निवेदन घेण्यास टाळाटाळ धोरणाचा जाहिर निषेध.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।