जिल्हा परिषद कोरोनामुक्त ! सात्त्विक अन्नप्राशन, योग्य व्यायाम व प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास सहजपणे मात करू शकतो- अध्यक्ष क्षीरसागर !! जनतेनेही सोशल डिस्टन्सिंग पाळणे व महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्यास कोरोनाला हररविणे अवघड नाही- मुख्य कार्यकारी अधिकारी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

     नासिक जिल्हा परिषद कोरोनामुक्त
                   नासिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह आला होता, तत्काळ त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते, ते आज कोरोनावर मात्र करून सुखरूप बाहेर पडले. नासिक जिल्हा परिषदेच्या एका संशयित रूग्णामुळे संपूर्ण जिल्हाभरात खळबळ माजली होती, आज या परिस्थितीतून जिल्हा परिषद कोरोनामुक्त झाली. 
           जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी जनतेला आवाहन करताना सांगितले की, आपला रोजचा आहार सात्त्विक अर्थात घरगुती आहार व त्यासोबत निवासी व्यायाम केल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता वाढीस लागते हा कोविड-१९ लागेल हरविण्याचा सर्वात मोठा उपाय आहे यासोबत प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे पालन केले तर कोरोना जिल्हाभरातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.
                जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासनाने वेळोवेळी  केलेल्या विविध उपाययोजना व सूचना सर्व अधिकारी, कर्मचारी अंमलात आणतात यामुळे हाॅटस्पाट ठरलेल्या नासिक जिल्ह्याची मातृसंस्था असलेली नासिक जिल्हा परिषद खंबीरपणे काम करत आहे हे कौतुकास्पद ठरू पाहत आहे, जनतेनेही सोशल डिस्टन्सिंग पाळणे व महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर न पडल्याचा निश्चय केला तर कोरोनाला हरविणे अवघड नसल्याचा पुनरुच्चार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी न्यूज मसाला शी बोलताना व्यक्त केला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।