संपादकीय, नासिक ते दिल्ली एक शोकांतिका !! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो "विश्वस्त" यात जागा होईल त्याला जनता आजही "नेता", "हिरो" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी "टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार". जनतेच्या उद्रेकाची...............!!! न्यूज मसालाचा अंक व विविध बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

संपादकीय
नासिक ते दिल्ली एक शोकांतिका !
जागतिक महामारी ने जगात थैमान घातले आहे, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे, अब्जावधी जनतेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत लग्न, वाढदिवस, अंत्ययात्रा तसेच वरीष्ठ-कनिष्ठ सभागृहांच्या सभा रद्द केल्या जात आहेत, भारताला शेजारी देशांशी लढायची वेळ आली आहे आणि......
         नासिक महानगरपालिका, नासिक जिल्हा परिषद आॅनलाईन का होईना सभा घेत आहेत जेव्हा केंद्रीय अधिवेशन स्थगित केले जाते, महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन फक्त दोन दिवस घेण्याची तयारी सुरू आहे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सभा घेण्याचा अट्टहास का ? विषय कोणताही असो पण जिथे टक्केवारी बाबत तोंड उघडले जाते याचा जर सर्वसामान्य जनतेने जाब विचारला तर राज्यकर्ते वा विरोधक किती तोंड लपवत फिरतील याची जाणीव नसावी यासारखे सुदैव की दुर्देव हे नियंत्यालाच माहीत. निवडून आलेल्या सदस्यांना "विश्वस्त" म्हणतात याचाही विसर पडतो काय ? जनतेला मुर्दाड समजण्याची चूक करणाऱ्यांबाबत जनतेनेच सुधारणा केली तर चित्र खूप वेगळं असेल ! जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणारी जमात म्हणजे राजकारणी हा समज रुढ झालेला मानला जात असताना कुठेतरी निद्रीस्त शरमेला जाग येण्याचे दिवस आहेत, जो "विश्वस्त" यात जागा होईल त्याला जनता आजही "नेता", "हिरो" समजेल, वेळ गेलेली नाही, सोडा कुठेतरी "टक्केवारी, कमीशन, भ्रष्टाचार". जनतेच्या उद्रेकाची जगात अनेक प्रकरणे दिसतात तेथे राजेशाही, हुकुमशाही, लोकशाही कशाचाही विचार जनता करत नाही.
      दिल्ली ही काही दूर नाही असं नेहमी म्हटले जाते यामागे जनता जनार्दनाचा आशिर्वाद फक्त गरजेचा आहे, दिल्लीत सरकार कुणाचेही असो, ते बदलून आपला हक्क कुणीही मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर तो संविधानाचा मानाचा बिंदू आहे, मात्र देश जर संकटात असताना संविधानाच्याच मार्गदर्शक तत्वाना अधिन राहून सरकारला साथ देणे, सरकार सोबत राहणे हीच खरी लोकशाही मुल्ये आहेत, जी आज कोरोना महामारी, चीनशी युद्धजन्य परिस्थिती, शेजारी नेपाळ आणि पारंपरिक (एकतर्फी) दुश्मनी करणारा पाकीस्तानला सरकार कसे तोंड देणार हे मुद्दे महत्त्वाचे असताना काॅग्रेस वगळता सर्व पक्ष सरकार सोबत अाहेत मग काॅंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणे कितपत योग्य आहे ? का म्हणून काॅग्रेसला दिल्ली दूर वाटते आहे ? देश ज्या ज्या वेळी संकटात होता त्या त्या वेळी विरोधी पक्ष सरकार सोबत होते हा इतिहास कसा विसरला जातो ? युद्धात हार वा जीत हे नंतर सिद्ध होते, त्यांचे परिणाम चांगले वा वाईट काहीही असो पण ते दूरगामी असतात, देश उभा करायचा असेल तर प्रत्येकात देशप्रेम जागृत हवे, अन्यथा एक व्यक्ती किंवा समूह स्वत:सह देशाला गुलाम बनवू शकतो हे कळू नये इतकी भारतीय जनता खुळी नाही, वेळ आल्यास "आपुलेच आपले वैरी" अशी म्हणण्याची पाळी आल्यास आश्चर्य वाटायला नको !
      नासिक ते दिल्ली हा प्रवास सन २०२० व त्यापुढील खडतर असला तरी अवघड कुणालाच नाही, प्रवासासाठी जनतेला गृहीत धरण्याचे धाडस केले नाही, फक्त विश्र्वास संपादन करायला हवा, टक्केवारीत गुंतले व देशाच्या संकटसमयी अवदसा आठवून अघोरीपणा हातून घडलाच तर दिल्ली दूरच साधी नासिक मनपा असो वा नासिक जिल्हा परिषद दूरच राहील..............



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !