आरोग्य अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

              नासिक, दि .२५::- नंदुरबार जिल्हा परिषद, नंदूरबार अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी हरीचंद्र टिकाराम कोकणी, बटेसिंग नगर खांडबारा तालुका, नवापूर, जिल्हा नंदूरबार याने  ७५६५०/- रुपयांची लाचेची मागणी करून ५००००/- रुपये लाच स्वीकारली असता लाचलुचपत विभाग नासिक अंतर्गत नंदुरबार युनिट यांनी रंगेहात अटक केली आहे. या बाबत तक्रारदार यांनी तक्रार केली होती. तक्रारदार यांचे कुटूंबाच्या मालकीचे शासकीय मान्यताप्राप्त सोनोग्राफी सेन्टर नवापूर येथे असून त्याची कायदेशीर नोंद झाली आहे.  शासकीय योजनेअंतर्गत गरोदर मातां-पेशंट कडून तपासणी केल्यानंतर मोबदला न घेता  शासकीय दर प्रति पेशंट ४००/- रुपये या मानधनावर तपासणी करण्याचा करार झाला होता.
त्याप्रमाणे नमुद कार्यालयाचे  लोकसेवक आरोपी डॉक्टर हरीचंद्र कोकणी यांनी प्रत्येक पेशंट मागे रुपये ५०/- प्रमाणे एकूण ७५६५०/- रुपयांची ची मागणी करून तडजोडी अंती रुपये ५००००/- ची लाच नवापूर येथे पंच व साक्षीदार यांच्या समक्ष मागणी केली  म्हणून गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कारवाई शिरिष जाधव पोलीस उप अधिक्षक, नंदूरबार युनिट, पोलिस निरीक्षक जयपाल अहिररराव, व  सहकारी उत्तम महाजन संजय गुमाणे, मनोहर बोरसे , दीपक चित्ते ,संदीप नावडेकर, मनोज अहिरे  अमोल मराठे , ज्योती पाटील इ केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।