आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी बहुउद्देशीय शेडचे लोकार्पण ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!



आदिवासी भागातील शाळांसाठी बहुउद्देशीय शेडचे लोकार्पण !


 नाशिक ( प्रतिनिधी )- विद्यार्थ्यांचे संस्कारवर्ग, सांस्कृतिक व अन्य कार्यक्रम कोरोनाच्या काळात मोकळेपणाने घेता यावेत या उद्देशाने मुंबईतील माटुंग्याच्या अजरामर महिला मंडळातर्फे पेठ तालुक्यातील कुळवंडी व कोहोर येथील जि.प.शाळांना प्रशस्त बहुद्देशीय शेड बांधून देण्यात आले. नुकतेच या शेडच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त दोन्ही शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना स्वेटर, चॉकलेट, बिस्किट, चिक्की, कॅडबरी, ,फळे व शिरा यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, शिक्षकांनी व पालक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
          यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमास सेवा ग्रुपचे संचालक चंद्रकांतभाई देढिया , शिक्षक हरिश्चंद्र भोये (पाटे), विजय भोये (घोसाळी), तसेच दोन्ही शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी घंटेवाड, मुरलीधर महाले यांनी केले तर कोहोर व कुळवंडी शाळेचे मुख्याध्यापक बोरसे सर, भोये सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी अजरामर ग्रुपच्या अध्यक्षा पानबाई अमृतलाल गाला व इतर महिला सदस्यांनी सर्वांचे स्वागत केले.मनोगताद्वारे सर्वांशी संवाद साधला. आमास सेवा ग्रुपचे सदस्य चंदकांतभाई देढिया, येडे सर, भरत बांबेरे (भंडारदरा), धनंजय भोये, दिलीप गायकवाड (रोंघाणे), ज्ञानेश्वर कोकणे 
( विळवंडी ) तसेच कोहर व कुळवंडी केंद्रातील शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।