विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा काव्यसंग्रह “हृदयरंग” चे प्रकाशन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा काव्यसंग्रह “हृदयरंग” चे प्रकाशन

नाशिकच्या लेखिका विजयालक्ष्मी मणेरीकर यांचा पहिला कवितासंग्रह “हृदयरंग “ चे प्रकाशन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज प्रकाशित झाला. सुप्रसिद्ध समीक्षक , वक्ते, लेखक  मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा कवितासंग्रह प्रकाशित झाला.

दिलिपराज प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर मसापा चे अध्यक्ष राजीव बर्वे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील , मराठी प्रकाशन मंचाचे प्रमुख वसंत खैरनार, तसेच जी पी खैरनार, अर्जुन वेलजाळी , शशांक मणेरीकर , प्रमोद पुराणिक, प्रकाश कोल्हे , राजेन्द्र नारखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संग्रह प्रकाशित झाला.

यात एकूण ९५ कविता आहेत.
हा कविता संग्रह प्रेम कवितांचे संकलन आहे. यातील
कविता मुक्तछंदातल्या आहेत. प्रत्येकाच्या हृदयाच्या कुपीत दडलेल्या प्रेमभावनांचे प्रकटीकरण या कवितांतून प्रकट होते. या संग्रहातील काही काव्यपंक्ती…

व्रण -
तू बोलला नाहीस
पण दिसले व्रण
कोणी बोचकारून
हळवे केलेले तुझे मन

चेहरे - कवितेत त्या म्हणतात -

चेहरे बरंचं काही भलेबुरे बोलतात
शब्दांच्या कितीतरी पुढे धावतात
शब्दांच्या कितीही झाडल्या लडी
खरे तर चेहरेच सोडवतात सारी कोडी

आठवण
आठवणींचा मोहोर
न दिवस पाहतो न प्रहर
असा चढतो भरभर
घुसळतो शहारतो अंगभर

महाराष्ट्रातील पन्नास वर्षे पूर्ण केलेले पुणे येथील  प्रसिद्ध  दिलिपराज प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी लक्ष्मीमंगेश या नावाने ह्या कविता लिहिला आहे. नाशिक येथील पुस्तकपेठ, ज्योती ग्रंथ प्रदर्शन येथे उपलब्ध आहे. तसेच ॲमेझॅानवरही लवकरच उपलब्ध होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कृषि विभागाच्या सर्व योजना शेतक-यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने व्यापक कार्यक्रम हाती घ्यावा- जिल्हाधिकारी गंगाथरन, शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घ्यावा- श्रीमती लीना बनसोड

पापडीवाल दाम्पत्याच्या अतूट श्रद्धेचा भक्तिमय प्रत्यय ! जयजयकारात महामस्तकाभिषेक संपन्न !

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाची यात्रेदरम्यान रोज सजावट ! मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीतून सजावट करण्याचे अवघड कार्य !