मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे !  मंत्री सुभाष देसाई यांची मागणी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे !  मंत्री सुभाष देसाई यांची
मागणी !


   नाशिक( प्रतिनिधी)  ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सकाळच्या सत्रात काल ( दि.३ ) मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी मंत्री देसाई व भुजबळ यांनी राष्ट्रपतींना ‘पत्र’ लिहिले.केंद्र सरकारने २००४ साली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे.त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा त्वरित मिळायला हवा असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री ना. सुभाष देसाई यांनी केले.
       प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे.
          या संदर्भातील अनेक पुराव्यांनी सिध्द झाले आहे की, मराठी ही अभिजात भाषा आहे. तरी  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असे  मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई  यांनी सांगितले.साहित्य संमेलनात अभिजात मराठी भाषा दालन निर्माण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल सकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तशी मागणी देसाई यांच्या समवेत पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे. तसेच या दालनास भेट देणाऱ्या प्रत्येकाने या पत्रावर स्वाक्षरी करुन राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत विंनती करावी, असे आवाहनही यावेळी देसाई यांनी केले. यावेळी अ भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले - पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जतेगावकर, तसेच पदाधिकारी मुकुंद कुलकर्णी, दिलीप साळवेकर, विश्वास ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

टिप्पण्या

  1. खूप छान पाऊल उचलल्या गेले...मराठी भाषेला हा सन्मान मिळायलाच हवा. अतिशय स्तुत्य उपक्रम

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अधिवेशनात मांडला ठराव-विद्युत कर्मचाऱ्यांसाठी ‘एक राष्ट्र, एक नियम’ असावा !

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.

भगवान बुद्धांचे पर्यावरणवादी विचार ! १६ में बुद्ध जयंती निमित्त विनम्र अभिवादन!