एक हात मदतीचा ! रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्तांना नाशिक जिल्हा परिषदेचा " माणुसकीचा " आधार !



रायगड जिल्ह्यातील तळीये दरडग्रस्तांना नाशिक जिल्हा परिषदेचा "माणुसकीचा"
आधार

   नाशिक (३१)::- महाराष्ट्र राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापुर व काही प्रमाणात सोलापुर जिल्ह्यामध्ये पुर पाण्यामुळे मोठ्या शहारांसह छोट्या मोठ्या गावांना पुर पाण्याने वेढा दिला, रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये या डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांवर पावसाच्या अति वृष्टीमुळे डोंगराची दरड कोसळुन संपूर्ण गाव जमीनदोस्त झाले. या अस्मानी संकटामुळे अनेक कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडली, या कुटुंबांना आधार देण्यासाठी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मदतीचे आवाहन केले व रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क करत परिस्थितीची माहिती घेतली , त्याच बरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी दरड कोसळून जमिनीखाली दाबलेल्या तळीये गावाचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधत आवश्यक मदतीचा तपशील घेतला व त्याद्वारे नाशिक जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत पदाधिकारी, सदस्य, सर्व खाते प्रमुख, विविध संवर्गीय संघटना यांनी एकत्रितरित्या सुमारे सहा लाख रुपयांच्या गृह उपयोगी वस्तूंचे संकलन करत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडमधील महाड तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना मदत म्हणून या वस्तू आज (३१) रोजी ट्रकद्वारे पाठवण्यात आल्या. यामध्ये तळीये या दरडग्रस्त गावास साधारणपणे १२५ कुटुंबासाठी, पोळपाट, लाटणे, तवा, कढई, बादली, हंडा, कळशी, बेडशीट, चादर, बनियन, साडी, ब्लॅंकेट, ताटे, स्टील ताटे, वाट्या, सांडशी, चमचे, किटली, वाट्या, मोठा डबा, टॉवेल, अंडरवेअर, बनियन, महिलांसाठी अंतर्वस्त्र, टूथब्रश, टूथपेष्ट, प्लास्टिक बादली, मग व गॅस शेगडी याप्रमाणे संपूर्ण सेट तयार करुन प्रत्येक कुटुंबास एक याप्रमाणे दिला जाणार आहे.
आवाहन केल्यानंतर अल्पावधीत जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटना यांनी मदत गोळा करत समाजभान जपले यासाठी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंदराव पिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, कार्यकारी अभियंता दादाजी गांगुर्डे, महेंद्र पवार, रवींद्र आंधळे, रणजीत पगारे, शीतल शिंदे, गणेश बगड, प्रकाश थेटे, जी.पी. खैरनार, विक्रम पिंगळे, पांडुरंग वाजे, अंबादास वाजे, अंबादास पाटील, विजयकुमार हळदे, विजय देवरे, प्रमोद निरगुडे, सचिन विंचूरकर, फैय्याज खान,  मधुकर आढाव, विजय सोपे, राजेंद्र बैरागी, शोभा खैरनार यांच्यासह सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।