चिपळूण पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावले नासिकचे मनसैनिक ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!चिपळूण पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावले मनसैनिक.

 

नाशिक : ढगफुटी व वसिष्ठी नदीला आलेल्या पूरामुळे कोकणातील चिपळूण, महाड, खेड, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी भयानक पुरस्थिती उद्भवली आहे. ढगफुटी मुळे खचलेल्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सैनिकांना तातडीने पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन केले आहे. मनसेचे नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी केलेल्या आवाहनाला मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सर्व मनसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळून जवळपास ७००० किलो तांदूळ, २५०० पेक्षा अधिक पाणी बाटल्या, दीड हजार ब्लेन्केट, सेनीटरी नेपकीन्स, सेनिटायझर, फिनाईल, बिस्कीट, फरसाण, बेसन, पीठ आदि साहित्य घेऊन याचे वाटप व्यवस्थित होण्यासाठी व तेथील पूर परिस्थीतीची पाहणी करून मदत कार्यात सहाय्य करण्याच्या उद्देशाने नाशिक मनसेचे पदाधिकारी चिपळूणला गेले आहेत. खेड येथील मनसे शहराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः तेथील परिस्थितीची पाहणी केली. पूर परिस्थीतीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावलेल्या मनसैनिकांनाही मदत करतांना गहिवरून आले.

नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, योगेश लभडे, उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा व अक्षय खांडरे, निकीतेश धाकराव, अजिंक्य बोडके, ललित वाघ, चारुदत्त भिंगारकर, कामिनिताई दोंदे, आरतीताई खिराडकर, पंकज दातीर आदि पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्ह्यातील चिपळूण, खेड, महाड तालुक्यांतील तळीये, आसंपोई, महाड शहर, पोलादपूर शहर, चिपळूण शहर, कुंभारवाडी, पेढे, फलची, नडगाव, खेड शहर, तसेच असंख्य छोट्या, मोठ्या वस्त्या, वाड्या आदि भागांत फिरून जीवनावश्यक साहित्यांचे वाटप केले व पूरग्रस्तांना धीर दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ व आणखी एक इसम लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!